Join us  

'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 2:14 PM

'पुष्पा 2' मधील नवीन गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात पुन्हा एकदा रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भूरळ घालायला सज्ज आहे (pushpa 2, rashmika mandanna, allu arjun)

 'पुष्पा 2' ची उत्सुकता शिगेला आहे. अल्लू अर्जून पुन्हा एकदा  'पुष्पा' बनून 'झुकेगा नही साला' म्हणत सर्वांना भूरळ पाडायला सज्ज आहे.  'पुष्पा 2' च्या माध्यमातून अल्लू, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदाना यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालीय. काही दिवसांपुर्वी  'पुष्पा 2' मधील 'पुष्पा पुष्पा' हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. आता याच सिनेमातील 'श्रीवल्ली' म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या दुसऱ्या गाण्याची झलक शेअर करण्यात आली आहे.

 'पुष्पा 2' च्या श्रीवल्ली गाण्याचा प्रोमो

 'पुष्पा 2'  च्या नवीन गाण्याचा प्रोमो रिलीज झालाच. या प्रोमोत बघायला मिळतं की, रश्मिका शूटींगची तयारी करतेय. ती मेकअप करताना दिसतेय. इतक्यात कोणीतरी तिला येऊन  'पुष्पा 2' च्या नवीन गाण्याची आठवण करुन देतं. रश्मिका आहे त्याच कपड्यांवर थिरकायला लागते. पुन्हा एकदा रश्मिका श्रीवल्लीच्या अदांनी प्रेक्षकांना फिदा करणार यात शंका नाही. हे संपूर्ण गाणं २९ मेला रिलीज होणार आहे.

'पुष्पा 2' कधी होणार रिलीज

Mythri Movie Makers ने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2: द रुल' ची निर्मिती केली आहे. अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल' सिनेमा जगभरात रिलीज करणार आहे. सुकुमार दिग्दर्शित अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या भागाच्या घवघवीत यशानंतर  'पुष्पा 2'  ची जगभरातील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनरश्मिका मंदानापुष्पा