Join us

हृदयद्रावक! लेकीच्या लग्नानंतर प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचं निधन; 2 दिवसांनी होतं मुलाचंही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 15:17 IST

Punjabi Singer Nachhatar Gill : आपल्या मुलीची पाठवणी केल्यानंतर नछतर आणि त्यांची पत्नी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते.

पंजाबी गायक नछतर गिल यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. 14 नोव्हेंबरला नछतर गिल यांच्या मुलीचं लग्न झालं. आपल्या मुलीची पाठवणी केल्यानंतर नछतर आणि त्यांची पत्नी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. 17 नोव्हेंबरला मुलाचं लग्न होणार होतं. नछतर यांची पत्नी आजारी असूनही लग्नामुळे खूप आनंदी होत्या. पण आनंदावर अशाप्रकारे विरजण पडेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.

नछतर गिल यांच्या पत्नी दलविंदर कौर यांचं 15 नोव्हेंबर रोजी निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या एक दिवस आधी त्यांनी लेकीची पाठवणी केली होती. घरात खूप आनंदाचं वातावरण होतं. मुलीच्या लग्नानंतर दलविंदर कौर यांची तब्येत खालावली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. 17 नोव्हेंबरला मुलाचं लग्न आहे, पण अशा स्थितीत नछतर गिल यांच्या मुलाचं लग्न होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नछतर गिल यांची पत्नी दलविंदर कौर दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती आणि त्यात कोणतीही सुधारणा दिसत नव्हती. दलविंदर कौर यांच्या निधनामुळे पंजाबी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. नछतर गिल फक्त गायकच नाहीत तर गीतकार आणि संगीतकारही आहेत

नछतर यांचे वडीलही गायक होते. गावातील मंदिरात होणाऱ्या वार्षिक सोहळ्यात नछतर गिलही वडिलांसोबत गायचे. नछतर गिल यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. 2012 मध्ये 'गल सुन हो गया' या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"