Join us

प्रियंका घेतेय मराठीचे धडे

By admin | Updated: April 29, 2015 23:13 IST

भूमिकेसाठी चांगली मेहनत घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोपडाचे नाव घेतले जाते. बाजीराव - मस्तानी चित्रपटात पेशव्यांची सम्राज्ञी काशीबाईची भूमिका प्रियंका करीत आहे.

भूमिकेसाठी चांगली मेहनत घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोपडाचे नाव घेतले जाते. बाजीराव - मस्तानी चित्रपटात पेशव्यांची सम्राज्ञी काशीबाईची भूमिका प्रियंका करीत आहे. या भूमिकेसाठी मराठी भाषा येणे गरजेचे असल्याने प्रियंका सध्या मराठी भाषेचे बारकावे समजून घेत आहे. तिने यासाठी शिकवणीही लावली आहे. आता अस्सल मऱ्हाठमोळा पेहराव करून आणि बोलून प्रियंका आपल्या भूमिकेला किती न्याय देते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.