Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रमन काका तुम्ही...", मन्नारा चोप्राच्या वडिलांच्या निधनानंतर प्रियांका चोप्राची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:30 IST

'बिग बॉस' फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे १६ जून २०२५ रोजी निधन झाले. रमन राय हांडा यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने शोक व्यक्त केला आहे.

'बिग बॉस' फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा यांचे १६ जून २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने चोप्रा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमन हांडा काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, याच दरम्यान त्यांच्या प्रकृती बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

रमन राय हांडा यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने शोक व्यक्त केला आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. "तुम्ही कायमच आमच्या हृदयात राहाल. रमन काका तुमच्या आत्म्यास शांती लाभो, ओम शांती", असं प्रियांका चोप्राने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मन्नारा चोप्राचे वडील रमन हांडा हे प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्राचे काका होते. रमन राय हांडा हे प्रियांका चोप्राच्या आत्याचे पती होते. त्यांच्या निधनाने चोप्रा कुटुंबीय दु:खात आहे. 

रमन राय हांडा यांच्या पार्थिवावर आज (१८ जून २०२५) मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील अंबोली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित राहतील. रमन राय हांडा एक प्रसिद्ध वकील होते आणि दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटी