Join us

या 'कैदी'नं कमावले पाच दिवसांत 164 कोटी रुपये

By admin | Updated: March 7, 2017 23:58 IST

दक्षिणेतला सुपरस्टार चिरंजीव यांच्या कैदी नंबर 150 या चित्रपटानं जगभरात पाच दिवसांत 164 कोटींचा गल्ला जमवला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - दक्षिणेतला सुपरस्टार चिरंजिवी यांच्या कैदी नंबर 150 या चित्रपटानं जगभरात पाच दिवसांत 164 कोटींचा गल्ला जमवला आहे. दक्षिणेतला अभिनेता चिरंजिवीचा चित्रपट कैदी नंबर 150 गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. दक्षिण भारतातील एकाच भाषेत सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे.या चित्रपटाचे निर्माता हे राम चरण असून, दिग्दर्शन व्ही. व्ही. विनायक यांनी केलं आहे. ब-याच काळानंतर चिरंजिवी यांचा चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. हा सिनेमा तमीळमधल्या कथ्थीचा रिमेक आहे. मस्कटच्या अल रियाद कन्स्ट्रक्शन आणि ट्रेडिंग एलएलसी कंपन्यांनी 11 जानेवारीला चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी सुट्टीची घोषणा केली होती. या चित्रपटासाठी बॉस इज बॅक ही टॅगलाइनही वापरण्यात आली आहे. या चित्रपटानं दक्षिणेतल्या मोठ्या चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहेत. या चित्रपटात काजल अग्रवाल आणि तरुण अरोरा यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटात चिरंजिवीचा डबल रोल पाहायला मिळणार आहे. मूळचा चित्रपट अभिनेता असलेला चिरंजिवी राजकारणात आल्यानंतर चित्रपटसृष्टीपासून काहीसा दुरावला होता. मात्र आता तो पुन्हा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.