Join us  

"माझी बायको उत्तम अभिनेत्री असं मी गमतीत..."; प्रसादची अमृतासाठी खास पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 3:27 PM

झी नाट्य गौरव सोहळ्यात अमृताला पुरस्कार मिळाल्यावर प्रसादने लिहिलेली खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय म्हणाला प्रसाद बघा (prasad jawade, amruta deshmukh)

अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांनी काही महिन्यांपुर्वी एकमेकांशी लग्न केलं. लग्नानंतर या दोघांचा पहिला पाडवा उद्या साजरा होईल. पण त्याआधीच अमृता - प्रसादच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे अमृताला झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने प्रसादने बायकोसाठी खास पोस्ट लिहिलीय

प्रसादने अमृताचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अमृता झी नाट्य गौरव पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण पाहायला मिळतो. याशिवाय अमृताची नाटकाची रिहर्सल, पुरस्कार मिळाल्यानंतर तिने घरच्यांना केलेला भावूक व्हिडीओ कॉल अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. प्रसाद लिहितो,"अमृता आणि नियम व अटी लागू..ह्या जोडगोळीचा प्रवास मी खुप सुरवातीपासून आणि जवळून पाहिलाय.. तालमीच्या वेळेस घर शोधण्यापासून ते प्रत्येक दौऱ्यावर जाताना घर सोडतानाचा क्षण अगदी नीट लक्षात आहे .."

प्रसाद पुढे लिहितो, "माझी बायको उत्तम अभिनेत्री असली पाहिजे, असं एका interview मध्ये मजेमजेत बोललो आणि अमृताने ते फारच seriously घेतलं..haha! नाही पण..तिला जे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चं award मिळालय ते तिच्या उत्तम अभिनया बरोबरच..शिस्त, चिकाटी आणि प्रामाणिकपणाबद्दल पण मिळालंय असही वाटतं..अमृता I am really really proud of you , you have brought tears in my eyes, this award will always hold a special place in our life .I lovee you a lotttt bubz"

टॅग्स :अमृता देशमुखनाटकमराठी