Join us

तेजश्रीने दिला जुन्या आठवणींना उजाळा

By admin | Updated: July 2, 2017 05:19 IST

‘लग्न पहावे करून’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि तेजश्री प्रधान यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाला समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा खूप

‘लग्न पहावे करून’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि तेजश्री प्रधान यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाला समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी तेजश्री आणि मुक्ता यांची छान गट्टी जमली होती. त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना नुकताच उजाळा दिला आहे. तेजश्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिचा आणि मुक्ताचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो माझ्या खूप जवळचा असल्याचे म्हटले आहे आणि मुक्ताला यावर तुला हा फोटो आठवतोय का, असे देखील विचारले आहे. तेजश्रीने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.