Join us  

'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री मिलिंद सोमणबरोबर झळकणार, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 1:32 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री ही अभिनेता मिलिंद सोमणबरोबर झळकणार आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील काही नावाजलेले कलाकार सध्या हिंदी विश्व गाजवताना दिसत आहेत.  या कलाकारांनी त्यांचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केलाय. सध्या अनेक मराठी कलाकार हे  हिंदी चित्रपट, वेब सीरिजम आणि जाहिरातीमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकतेच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लोकप्रिय अभिनेत्री ही अभिनेता मिलिंद सोमणबरोबर झळकणार आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतः पोस्ट केली आहे.

मिलिंद सोमण हा एक लोकप्रिय अभिनेता, निर्माता आणि मॉडेल आहे. त्याच्यासोबत मराठमोळ्या अभिनेत्रीला काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीची हिंदीमध्ये काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ही मराठी अभिनेत्री शाहीद कपूरच्या सिनेमात झळकली होती. ही दुसरी तिसरी कोणी नाही तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील वनिता खरात  (vanita kharat) आहे. 

नुकतेच वनिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये वनिता ही साडीत दिसत असून तिच्या कानाला हेडफोन लावले पाहायला मिळत आहे. तर मिलिंद सोमण वर्कआउट करताना दिसत आहे. वनिताची मिलिंद सोमणबरोबरची ही नवी जाहिरात आहे. जी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीय येणार आहे. ही जाहिरात कशासंदर्भात आहे? याचा खुलासा तिनं केलेला नाही. 

वनिता खरात हे नाव आता कोणत्याही प्रेक्षकवर्गाला नवीन नाही. वनिता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. वनिताने कबीर सिंह या बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. तसंच तिने सुंदरी या मालिकेतही खलनायिकेची भूमिका साकारली होती. सोशल मीडियावरही ती सक्रीय असून विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.  

टॅग्स :वनिता खरातमिलिंद सोमण बॉलिवूडमराठी अभिनेता