Join us  

या' अभिनेत्रीला भेटण्यासाठी भारतात आला होता हा अभिनेता, आला तर परत गेलाच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 3:10 PM

अनेक जुन्या सिनेमांमध्ये तुम्ही हा चेहरा पाहिला असेल. कधी विदेशी व्हिलन म्हणून तर कधी व्हिलनचा सहकारी म्हणून. हा अभिनेता इतर कलाकारांपेक्षा वेगळा दिसतो त्यावरुन तो भारतीय नाही हे स्पष्ट दिसतं.

मुंबई : अनेक जुन्या सिनेमांमध्ये तुम्ही हा चेहरा पाहिला असेल. कधी विदेशी व्हिलन म्हणून तर कधी व्हिलनचा सहकारी म्हणून. हा अभिनेता इतर कलाकारांपेक्षा वेगळा दिसतो त्यावरुन तो भारतीय नाही हे स्पष्ट दिसतं. पण हा अभिनेता बॉलिवूडमध्ये दाखल कसा झाला याचीही एक फिल्मी कहाणी आहे. हा कलाकार पाहिला अनेकांनी असेल पण याचं नाव फार कमी लोकांना माहित असेल. बॉल क्रिस्टो असं या अभिनेत्याचं नाव आहे. 200 पेक्षा जास्त सिनेमात करुनही जर या अभिनेत्याचं नाव कुणाला माहीत नसेल तर दुर्दैवच म्हणावं लागेल. 

या कलाकाराला जेव्हाही आपण पडद्यावर पाहिलं तेव्हा कधी सोन्याची स्मगलिंग करत दिसला, कधी अभिनेत्रीवर जबरदस्ती करताना तर कधी मारधाड करताना दिसला. अनेक सिनेमांमध्ये त्याला इंग्रज दाखवण्यात आले. पण मुळात हा कलाकार आहे कुठला? बॉलिवूडमध्ये कसा आला ? हे फारच रोमांचक आहे. 

दुसऱ्या महायुद्धावेळी जर्मनीत

1938 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात जन्म झालेल्या रॉबर्ट जॉन क्रिस्टो याचं जीवन फारच वेडंवाकडं वळणाचं राहिलं. 1943 मध्ये त्यांचे वडील जर्मनीला गेले. त्याचवेळी जर्मनीत दुसरं महायुद्ध सुरु होतं. अशावेळी बॉब जर्मनीत होते. इथे शिक्षण करत असताना बॉब थिएटरही करु लागले होते. त्यांची पहिली पत्नी हेल्गाही त्यांना इथेत भेटली होती. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. पुढे हेल्गाचा एका कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर बॉबने आपल्या मुलांना एका अमेरिकन कपलकडे सोपवलं आणि एका आर्मी असायमेंटसाठी व्हिएतनामला गेला. तिथे बॉब सैनिकांना माईन्स नष्ट करण्यात मदत करत होते. 

बॉलिवूडमध्ये कशी झाली एन्ट्री?

व्हिएतनामनंतर बॉब अनेक ठिकाणी गेले. हॉंगकॉंग, सेशेल्स, ओमान, साऊछ आफ्रिका इथे ते गेले. दरम्यान एकदा त्यांनी एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर अभिनेत्री परवीन बाबीचा फोटो पाहिला. ते परवीने फॅन झाले. ते परवीनचे इतके फॅन झाले की, तिला भेटण्यासाठी भारतात आले. ओमानमधील एका कन्ट्रक्शन कंपनीत त्यांना नोकरी मिळणार होती. पण त्यासाठी जरा वेळ होता. त्यावेळात त्याने भारतात येऊन परवीन बाबीला भेटण्याचा विचार केला आणि एकदा भारतात येऊन परत कधीच गेले नाही. 

परवीनला म्हणाले तू परवीन नाहीये....

बॉब क्रिस्टो यांना समुद्र खूप आवडायचा. त्यामुळे जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा ते सर्वातआधी जुहू बीचवर गेले. त्याचवेळी त्यांची भेट एका सिनेमाच्या यूनिटसोबत भेट झाली. ही सगळी लोकं चर्चगेटला एका टी-स्टॉलवर चहा घेत होते. बोलता बोलता असे कळाले की, कॅमेरामन दुसऱ्याच दिवशी परवीन बाबीला द बर्निग ट्रेनच्या सेटवर भेटणार आहे. बॉब यांनी त्याच्याकडून सेटचा पत्ता घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तेथे पोहोचले. 

इथे ते आपल्या कॅमेरामन मित्रासोबत बोलत असताना त्यांना परवीन बाबीचा आवाज ऐकायला आला. यावेळी ते परवीन बाबीला बोलले की, 'तुम्ही परवीन बाबी नाही आहात. या मॅगझिनवर फोटो असलेली मुलगी परवीन बाबी आहे'. त्यांच्या या बोलण्यावर परवीन जोरजोरात हसली. 

ती म्हणाली, 'मी शूटिंग व्यतिरीक्त मेकअप करत नाही. मी मेकअपशिवाय चांगली दिसत नाही का?

तेव्हा बॉब यांनी तिला सांगितले की, ते तिला भेटण्यासाठी किती आतुर होते. पुढे परवीन आणि बॉब हे चांगले मित्र झाले. अनेक सिनेमात एकत्र काम केलं. इतकेच काय तर अनेकवर्ष ते शेजारीही होते. 

संजय खानसोबत खास मैत्री

बॉब यांना सिनेमात ब्रेक दिला तो संजय खान यांनी. राज कपूर , संजय खान आणि जीवन यांच्या 'अब्दुल्लाह' सिनेमात त्यांना 1980 मध्ये पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी एका जादूगाराची भूमिका केली होती. जो डॅनीसाठी काम करतो. त्यानंतर ब़ॉबने 200 बॉलिवूड सिनेमात काम केले.

 

साऊथ सिनेमातही काम

बॉब यांचा दुसरा सिनेमा होता फिरोज खान यांचा कुर्बानी. कुर्बानी हिट झाल्यावर बॉब यांना एका तेलगु सिनेमाची ऑफर आली. या सिनेमात एन टी रामाराव आणि चिरंजीवी हे होते. त्यानंतर त्यांना अनेक साऊथ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 

बॉब यांच्या पहिल्या पत्नी हेल्गा यांचं एका कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न भारतात नर्गीससोबत केलं. नर्गीसकडून त्यांना एक मुलगा आहे.  20 मार्च 2011 मध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

टॅग्स :बॉलिवूड