Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिट्या भाईने खरेदी केली नवी कोरी कार, रमेश परदेशी म्हणतात- "१४ वर्ष स्विफ्टमधून फिरलो आता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 09:47 IST

पिट्या भाईने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पिट्या भाईने नवी कोरी कार खरेदी केली आहे. 

रमेश परदेशी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक सिनेमांमध्ये ते विविधांगी भूमिका साकारताना दिसले. पिट्या भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश परदेशी यांचा चाहता वर्गही मोठा आहे. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकतंच पिट्या भाईने एक गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पिट्या भाईने नवी कोरी कार खरेदी केली आहे. 

सोशल मीडियावर नव्या गाडीचे फोटो रमेश परदेशी यांनी शेअर केले आहेत. रमेश परदेशी यांनी किया कंपनीची गाडी खरेदी केली आहे. गाडीचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्टही लिहिली आहे. "आज गाडी घेतली नवीन...वडिलांचा आशिर्वाद आणि ज्याच्यासोबत चालायला सुरुवात केली तो माझा भाऊ, मित्र सर्वकाही ह्याच्याकडून पूजा केली. आधी १४ वर्ष स्विफ्टमधून लयी फिरलो. इथवर आलो आता इथून पुढचा प्रवास ह्यातून...हे शक्य झाले ते फक्त मकरंद घेवारी आणि चेतन धोत्रेमुळे. तुम्ही आयुष्यात बाकी काही करा अथवा करू नका. पण मित्र आणि मैत्री जपा. मित्र असतील तर जगात काहीही शक्य आहे...", असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. 

रमेश परदेशी यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रमेश परदेशी आणि प्रविण तरडे यांची जिगरी दोस्ती आहे. रमेश परदेशी यांनी 'धर्मवीर', 'चौक', 'सर्किट', 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी