Join us

पार्टी असो वा रेड कार्पेट ऐश्वर्या राय बच्चन क्षणभरही सोडत नाही आराध्याचा हात, काय हे आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 17:09 IST

1 / 9
ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या दोघीही जेव्हा केव्हा एकत्र दिसतात, ट्रोलिंगचा मुद्दा बनतात.
2 / 9
इव्हेंट कुठलाही असो पार्टी असो, फंक्शन असो, कान्स सारखा सोहळ्याचे रेड कार्पेट असो की काहीही़ ऐश्वर्या आराध्याचा हात सोडत नाही.
3 / 9
यावरून अनेकदा ऐश्वर्या ट्रोल झाली आहे. पण ऐश्वर्याने त्याची पर्वा केली नाही. खरे तर पर्वा करावी ही का?
4 / 9
लोक कितीही ट्रोल करतो, प्रत्यक्षात ऐश्वर्या चांगली पालक असल्याचा तो पुरावा आहे.
5 / 9
मुलं चालायला लागतात, तेव्हा पालक त्यांच्या हात पकडतात. जेणेकरून ते धडपडू नयेत, पडू नयेत. यामागे मुलांची सुरक्षा हा हेतू असतो. ऐश्वर्या सेलिब्रिटी आहे, ती जिथे जाईल तिथे गर्दी जमते. अशात गर्दीत तिने आराध्याचा हात का पकडू नये?
6 / 9
अनेकदा मुलं लाजतात किंवा गर्दी बघून भांबावतात. अशात ते आपल्या आईवडिलांचा हात पकडतात. मुलांचा पालकांवरचा विश्वास यातून दिसतो.
7 / 9
ऐश्वर्या व आराध्याच्या बाबतीत आराध्या पापाराझींना घाबरून आईचा हात पकडताना दिसली आहे.
8 / 9
मुलांचा हात पकडून चालणे हा इमोशन्स दाखवण्याचा व मुलांशी स्वत:ला इमोशनली कनेक्ट करण्याचाही एक मार्ग आहे. ऐश्वर्या हे उत्तमरित्या जाणते.
9 / 9
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन