Join us  

Femina Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं जिंकला ‘मिस इंडिया’चा ताज, कोण आहे ही साऊथची ब्युटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 11:11 AM

1 / 10
देशाला नवी ब्युटी क्वीन मिळाली आहे. होय, फेमिना मिस इंडिया 2022 ची घोषणा झालीये. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया 2022 चा खिताब जिंकला आहे.
2 / 10
ब्युटी विद ब्रेन सिनी शेट्टीने 31 फायनलिस्ट सौंदर्यवतीने हरवत हा खिताब जिंकला. राजस्थानची रुबल शेखावत ही पहिली उपविजेती ठरली. त्याचवेळी उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी उपविजेती ठरली.
3 / 10
यंदाचा फेमिना मिस इंडिया इव्हेंट मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. टॉप 5 फायनलिस्टमध्ये सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, प्रज्ञा अय्यागरी आणि गार्गी यांचा समावेश होता. यापैकी सिनीने बाजी मारली.
4 / 10
फेमिना मिस इंडिया 2021 मनसा वाराणसी हिने मिस इंडिया 2022चा ताज सिनी शेट्टीला घातला. ही सिनी शेट्टी कोण, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. तर आज आम्ही तिच्याचबद्दल सांगणार आहोत.
5 / 10
21 वर्षांच्या सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला आहे. ती मूळची कर्नाटकची आहे. सिनीने अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.
6 / 10
सिनी अद्यापही शिकते आहे. चार्टर्ड फायनान्स अ‍ॅनालिस्टचा अभ्यासक्रम ती करते आहे. अभ्यात हुशार असलेल्या सिनीला नृत्याची प्रचंड आवड आहे.
7 / 10
वयाच्या चौथ्या वषार्पासून सिनीने नृत्याला सुरुवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत सिनी शेट्टी अरंगत्रम आणि भरतनाट्यममध्ये पारंगत झाली.
8 / 10
सिनीचं प्रोफाईल बघता, ती एक मल्टीटॅलेंटेड मुलगी आहे, हे स्पष्ट दिसतं. मॉडेल म्हणून तिने आपल्या करिअरची सुरूवात केली. अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये ती झळकलेली आहे.
9 / 10
सौंदर्याच्या बाबतीही ती कमी नाही. युनिक स्टाईलने ती बॉलिवूड अभिनेत्रींनाही मात देते. तिच्या सौंदर्यावर कुणीही फिदा होईल.
10 / 10
सिनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 66.3k फॉलोअर्स आहेत. आता तर ती मिस इंडिया झाली आहे. साहजिकच तिचे फॉलोअर्स वाढणार आहेत.
टॅग्स :मिस इंडिया