Join us  

बॉलिवूड अभिनेत्याने दिला नितीन देसाईंना त्रास; प्रसाद लाड यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 9:58 AM

1 / 8
लोकप्रिय मराठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
2 / 8
त्यांच्या आत्महत्येमुळे सध्या कलाविश्वासह राजकारणातही मोठी चर्चा सुरु झाली आहे.
3 / 8
कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे.
4 / 8
नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हॉइस नोट रेकॉर्ड केल्या होत्या. यात त्यांनी चार बिझनेसमॅनच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे.
5 / 8
नितीन देसाई यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. यामध्येच आता एका बॉलिवूड अभिनेत्याचं नाव समोर येत आहे. या अभिनेत्याने नितीन देसाईंना मानसिक त्रास दिल्याचं म्हटलं जात आहे.
6 / 8
विधानसभेमध्ये नितीन देसाई यांच्या कर्जाचा मुद्दा उचलून धरला गेला. यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठा दावा केला आहे.
7 / 8
एका बॉलिवूड अभिनेत्यामुळे नितीन देसाईंना काम मिळणं बंद झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
8 / 8
नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक ऑडिओ क्लिप करुन ठेवली. यात एका बॉलिवूड कलाकारासोबत वाद झाल्यामुळे मला बॅालिवूडमध्ये काम मिळत नाहीये असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा बॉलिवूड कलाकार कोण? याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईप्रसाद लाडसेलिब्रिटीसिनेमा