Join us  

३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण क्रिकेटपटूसोबतच्या त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 7:55 PM

1 / 7
कधी स्टायलिश अंदाज तर कधी रिषभ पंतसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यावेळी लाखो रुपये किमतीचा आयफोन हरवल्यामुळे चर्चेत आहे.
2 / 7
उर्वशीने २०१३ मध्ये तिच्यापेक्षा ३७ वर्षांनी मोठ्या सनी देओलसोबतच्या सिंह साब द ग्रेट सिनेमामधून बॉलिवूडमध्ये परादर्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट फ्लॉप झाला होता. तेव्हापासून तिने बॉलिवूडमध्ये १० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.
3 / 7
१० वर्षांच्या कारकिर्दीत उर्वशी रौतेलाने २५ हून अधिक चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलं आहे. मात्र या १० वर्षांत तिच्या खात्यात एकही हिट चित्रपट जमा झालेला नाही.
4 / 7
सततच्या फ्लॉप चित्रपटांनंतर उर्वशीने २०१६ मध्ये द ग्रेट ग्रँडमस्ती या ए ग्रेड चित्रपटामध्ये काम केलं. मात्र हा चित्रपटही तिच्या कारकिर्दीला गती देऊ शकला नाही. मात्र उर्वशीने आयटम्स डान्समधून फॅन्सचं लक्ष वेधून घेतले. तसेच एका कथित अफेअरच्या चर्चेने तिच्या स्टारडमला आणखीच झळाळी दिली.
5 / 7
एका मुलाखतीमध्ये उर्वशीने सांगितले होते की, मिस्टर आरपी मला भेटण्यासाठी दिल्ली आला होता. मात्र मी हॉटेलच्या खोलीत झोपले होते. तो १० तास वाट पाहत होता. मग तो निघून गेला. त्यानंतर तिच्या आणि रिषभ पंतमधील अफेअरच्या चर्चांना जोर चढला होता. मात्र नंतर तिने मी राम पौथिनेनीबाबत बोलत होते, असे तिने स्पष्ट केले.
6 / 7
सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरची चर्चा पसरली होती. रिषभ पंतचे फॅन्सही तिला भाभी म्हणून बोलवू लागले होते. मात्र नंतर उर्वशीला खूप ट्रोल व्हावं लागलं होतं. मात्र नंतर या दोघांमध्ये कुठलं नातं नसल्याचं स्पष्ट झालं होतं.
7 / 7
मात्र १० वर्षांत एकही हिट चित्रपट देऊ न शकलेल्या उर्वशीला या कथित अफेअरनं स्टार बनवलं. पुढच्या काळात उर्वशी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतसनी देओलसेलिब्रिटी