Join us  

'नाकावरच्या रागाला औषध काय...' गाण्यातील ही बालकलाकार आता दिसते अशी!, आहे खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 7:00 AM

1 / 9
कळत नकळत हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ यासारखे दमदार कलाकार लाभले होते. या चित्रपटासोबतच त्यातील ‘हे एक रेशमी घरटे..’ आणि ‘नाकावरच्या रागाला औषध काय…’ ही गाणी लोकप्रिय ठरली होती.
2 / 9
त्यात हे दोन बालकलाकार देखील झळकलेले पाहायला मिळाले. बच्चू साकारला होता ओमेय आंब्रे या बालकलाकाराने तर छकुली साकारली होती मृण्मयी चांदोरकर हिने.
3 / 9
तर चित्रपटातली छकुली अर्थात मृण्मयी चांदोरकर आता दिसते अशी
4 / 9
मृण्मयी चांदोरकर ही प्रसिद्ध लेखक व.पू.काळे यांची नात आहे.
5 / 9
व. पू. काळे यांचे पूर्ण नाव वसंत पुरुषोत्तम काळे. एक सुप्रसिद्ध लेखक, कथाकथनकार आणि कादंबरीकार म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांची मुलगी स्वाती चांदोरकर या देखील एक प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. मृण्मयी चांदोरकर ही स्वाती चांदोरकर यांची मुलगी आहे.
6 / 9

7 / 9
एक बालकलाकार म्हणून मृण्मयीने कळत नकळत चित्रपटात काम केले होते. परंतु पुढे मात्र ती कधी कोणत्या चित्रपटात पाहिली गेली नाही.
8 / 9
मृण्मयीचेही लग्न झाले असून ती आपल्या घर संसारात रमली आहे.
9 / 9
मृण्मयीला एक गोंडस मुलगीदेखील आहे.
टॅग्स :अशोक सराफ