Join us  

OMG!! बॉलिवूड डेब्यूच्या नादात सृष्टी रोडेचं एक वर्ष वाया गेलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 3:59 PM

1 / 9
अभिनेत्री सृष्टी रोडेची महिनाभरापूर्वी शस्त्रक्रिया झाली. सध्या ती डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, घरी विश्रांती घेतेय.
2 / 9
यादरम्यान एका मुलाखतीत सृष्टीनं असा काही खुलासा केला की, चाहतेही हैराण झालेत. होय, बॉलिवूड डेब्यूच्या नादात तिचं 2019 हे अख्ख वर्ष बर्बाद झाल्याचं तिनं या मुलाखतीत सांगितलं.
3 / 9
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. तिनं सांगितलं, बिग बॉस 12 नंतर मी एक बॉलिवूड सिनेमा साईन केला होता. पण तो अद्याप रिलीज झालेला नाही.
4 / 9
ती म्हणाली, मी गबरू गँग हा सिनेमा साईन केला होता. शूटींगही झाले. पण अद्याप हा सिनेमा रिलीज झालेला नाही.
5 / 9
या सिनेमानं माझे दोन वर्ष वाया घालवले. आता तर हा सिनेमा रिलीजबद्दलची सर्व उत्सुकताच संपली आहे. कारण 3 वर्ष झालीत. हा सिनेमा कधी रिलीज होईल, हे अद्यापही मला माहित नाही, असंही ती म्हणाली.
6 / 9
या चित्रपटाच्या रिलीजची वाट बघण्यात दोन वर्ष गेलीत. मग काम करण्याचा विचार केला तर कोरोना महामारी आली. आता मात्र मी कामासाठी तयार आहे आणि लवकरच एखाद्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करेल, अशी आशा आहे, असेही तिने सांगितले.
7 / 9
सृष्टीनं ब-याच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ये इश्क हाय या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. तिची शोभा सोमनाथ की मालिका खूप गाजली होती.
8 / 9
बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये सृष्टी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या सीझनमध्ये तिने धम्माल परफॉर्मन्स दिला होता.
9 / 9
टेलिव्हिजनवरचा ती एक लोकप्रिय चेहरा आहे. तिची स्टाईल आणि बिनधास्त लूकसाठी ती ओळखली जाते.
टॅग्स :सृष्टी रोडे