Join us
Daily Top 2Weekly Top 5

टिकेकरांचा होणारा जावई आहे तरी कोण?, लेक स्वानंदीने दिली ज्याच्यासोबत प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:30 IST

1 / 8
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) एका खास कारणाने चर्चेत आहे.
2 / 8
स्वानंदी टिकेकर ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लडकी लेक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 8
नुकतंच स्वानंदीने तिच्या प्रेमाची सोशल मीडियावर जाहिर कबुली दिली आहे. टिकेकरांचा होणार जावई आहे तरी कोण?, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. जाणून घेऊया स्वानंदीचा होणार पती आशिष कुलकर्णी कोण आहे ते. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 8
'आमचं ठरलंय' असं सांगत स्वानंदीने २० जुलै सोशल मीडियावर स्वानंदी आणि आशिषने प्रेक्षकांना सरप्राईज दिलं. त्यानंतर दोघांवर एकमेकांवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 8
आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.(फोटो इन्स्टाग्राम)
6 / 8
स्वानंदीसोबत जो दिसतोय तो आहे 'इंडियन आयडॉल १२' गाजवणारा गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni). होय, आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्याने सर्वांचंच मन जिंकलं होतं. त्याच्या गाण्याला तर तोडच नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 8
आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. मात्र या दोघांची नेमकी भेट कुठे झाली, त्यांचे सूर कधी जुळले असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडलेत. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 8
दोघे आता लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :स्वानंदी टिकेकरसेलिब्रिटी