Join us  

धनश्री काडगावकरचा Vacation mood; चिमुकल्या लेकासह घेतीये सुट्टीचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 6:48 PM

1 / 11
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.
2 / 11
धनश्री आज छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब याच नावाने ओळखली जाते. सध्या धनश्रीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, तिच्या नावाची कायम चाहत्यांमध्ये चर्चा असते.
3 / 11
काही महिन्यांपूर्वीच धनश्रीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून सध्या ती बाळाच्या संगोपनात व्यस्त आहे. त्यामुळेच तिने कलाविश्वातील वावर सध्या कमी केला आहे.
4 / 11
अलिकडेच धनश्री 'घेतला वसा टाकू नको' या मालिकेत झळकली होती.या मालिकेत तिने छोटेखानी भूमिका साकारली होती.
5 / 11
सोशल मीडियावर सक्रीय असलेली धनश्री तिच्या बाळासोबत क्वालिटी टाइम व्यतीत करत असून अलिकडेच ती तिच्या कुटुंबासोबत व्हेकेशनवर गेली आहे.
6 / 11
धनश्रीने इन्स्टाग्रामवर कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे.
7 / 11
सोशल मीडियावर सक्रीय असलेली धनश्री कायम तिच्या बाळासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
8 / 11
धनश्री तिच्या पती आणि चिमुकल्या बाळासोबत गणपती पुळे येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.
9 / 11
या व्हेकेशनमधील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
10 / 11
विशेष म्हणजे या फोटोंमध्ये तिच्या बाळाच्या चेहऱ्यावर गोड निरागस हास्य दिसून येत आहे. त्यामुळे तिच्यासोबत तिच्या बाळाचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
11 / 11
धनश्रीने शेअर केलेला कुटुंबासोबतचा छानसा फोटो
टॅग्स :धनश्री काडगावकरसेलिब्रिटीसिनेमा