Join us  

'त्या' सध्या काय करतात?, पहिलीच मालिका हिट पण आता कुठे आहेत या मराठी अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 7:00 AM

1 / 7
शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी या मालिकेतून तूफान लोकप्रियता मिळवणारी संजू अर्थातच अभिनेत्री शिवानी सोनार. मुख्य अभिनेत्री म्हणून शिवानीची ही पहिलीच मालिका होती. तर तब्बल ३ वर्षे ही मालिका सुरू होती. मात्र या मालिकेनंतर शिवानी अजून कोणत्याही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 7
सखी गोखले अभिनेत्री सखी गोखले आपल्याला दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत दिसली होती. तर या पहिल्याच मालिकेतून तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. पण या मालिकेनंतर सखी फारशी कुठेच दिसली नाही. मालिका तर तिने केल्याच नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 7
प्राजक्ता गायकवाड अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली होती. तिने महाराणी येसुबाईंची भूमिका साकारली होती. तर मुख्य भूमिकेतली ही तिची पहिलीच मालिका होती. यानंतर तिने आई माझी काळूबाई या मालिकेत काही मोजकेच दिवस काम केलं व त्यानंतर काही कारणांनी तिला ही मालिका सोडावी लागली. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 7
गौतमी देशपांडे माझा होशील ना या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच गौतमी देशपांडे. या मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी दिली. पण या मालिकेनंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही. सोशल मीडियावर गौतमी फार सक्रिय असते. तर बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसोबत नेहमीच तिचे नवनवीन व्हिडीओस आणि फोटोस पाहायला मिळतात. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 7
विदुला चौगुले जीव झाला एडापिसा या मालिकेतून लोकप्रिय झालेली विदुला देखील या मालिकेनंतर फारशी कुठे दिसली नाही. बॉईझ ३ या सिनेमात ती मागच्या वर्षी दिसली पण कोणत्याही मालिकेत ती अजूनही दिसली नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 7
किरण ढाणे अभिनेत्री किरण ढाणेला झी मराठी वाहिनीच्या लागीर झालं जी या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. पहिलीच मालिका असूनही तिच्या कामाचं मोठं कौतुक झालं होतं. पण या मालिकेनंतर किरण केवळ १ मालिका आणि चित्रपटात दिसली. तर नंतर कोणत्याही मालिकेत दिसली नाही.(फोटो इन्स्टाग्राम)
7 / 7
अस्मिता देशमुख अभिनेत्री अस्मिता देशमुखला देवमाणूस या मालिकेतून डिम्पल या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली होती. तिच्या कामाचही कौतुक झालं होतं. पण तीही या मालिकेनंतर कोणत्याच मालिकेत दिसलेली नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :गौतमी देशपांडेसखी गोखलेप्राजक्ता गायकवाड