Join us  

ही अभिनेत्री ठरली महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला, पाहा कोण कितव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 1:06 PM

1 / 12
तुमची आमची आवडती ‘शुभ्रा’ अर्थात तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक टीव्ही अभिनेत्री ठरली आहे. टीव्ही विश्वातील सर्वाधिक आकर्षक महिलांच्या यादीत ती प्रथम क्रमांकावर आहे.
2 / 12
या यादीत दुस-या क्रमांकावर अभिनेत्री पल्लवी पाटील आहे. ट्रिपल सीट, बॉइज 2 या सिनेमात झळकलेली आणि जिगरबाज या मालिकेत दिसलेली पल्लवी पाटील या यादीत दुस-या क्रमांकारवर आहे.
3 / 12
देवमाणूस मालिकेतील दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खान या यादीत तिस-या स्थानावर आहे. शिकारी या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.
4 / 12
जाडूबाई जोरात, माझ्या नव-याची बायको आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जग्गनाथ ही चौथ्या स्थानावर आहे.
5 / 12
अभिनेत्री नयना मुके ही पाचव्या स्थानावर आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेत तिने लक्ष्मीदेवीची भूमिका यादगार ठरली होती.
6 / 12
माझ्या नवºयाची बायको या मालिकेतील शनाया अर्था अभिनेत्री रसिका सुनिल ही या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
7 / 12
नव्या दमाची, स्टायलिश तन्वी मुंडले ही या यादीत सातव्या स्थानावर आहे.
8 / 12
स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा, साजणा, आॅलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील पूजा बिरारी ही आठव्या स्थानावर आहे.
9 / 12
माझा होशील ना मधील सई अर्थात अभिनेत्री गौतमी देशपांडे ही नवव्या क्रमांकावर आहे.
10 / 12
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही 10 व्या स्थानावर आहे.
11 / 12
लागीरं झालं जी या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री पूर्वा शिंदे ही 11व्या स्थानावर आहे.
12 / 12
अभिनेत्री ईशा केसकर ही 12 व्या स्थानावर आहे.
टॅग्स :तेजश्री प्रधान गौतमी देशपांडेईशा केसकर