तारक मेहता : 'माधवी भाभी'ने शेअर केला रिअल लाइफ पतीसोबतचा लग्नाचा फोटो, तुम्ही पाहिला का? By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 4:23 PM1 / 9'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील सर्वच कलाकार देशभरातील घराघरात लोकप्रिय आहे. या कलाकारांची पर्सनल लाइफची त्यांच्या चाहत्यांना माहीत आहे. या मालिकेतील भिडेची पत्नी म्हणजे माधवी भाभीची भूमिका साकारणाऱ्या सोनालिका जोशीची रील आणि रिअल लाइफही लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते.2 / 9सोनालिकाने बुधवारी आपल्या लग्नाचा एक जुना फोटो शेअर केला. तिने सांगितले की, त्यांच्या लग्नाला १९ वर्षे झाली आहेत. एका इन्स्टाग्राम पोस्टवर सोनालिका उर्फ माधवी भाभीने पती समीर जोशी सोबतचा फोटो शेअर केलाय.3 / 9दोघेही या फोटोत नवरी-नवरदेवाच्या रूपात दिसत आहेत. दोघांचाही हा फोटो पाहून फॅन्स आनंदी झाले आहेत. आणि त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 4 / 9या पोस्टसोबत सोनालिकाने लिहिले की, आम्हाला एकत्र १९ वर्षे झाली आहेत. हीच ती स्माइल आहे जी माझ्या चेहऱ्यावर दिसते. येणाऱ्या वर्षात आम्ही एकमेकांना आणखी जाणून घेऊ-समजून घेऊ. ज्या आमच्या आठवणी होतील.5 / 9'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील माधवीची भूमिका चांगलीच लोकप्रिय आहे. शोमध्ये ती टयूशन मास्टर आत्माराम भिडेच्या पत्नीची भूमिका साकारते. 6 / 9मालिकेत माधवी केवळ हाउस वाइफ नाही तर बिझनेसही करते. घरातील खर्चाला हातभार लागावा म्हणून ती लोणचं-पापडाचा बिझनेस करते.7 / 98 / 99 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications