Join us  

जाड मुलीला कशा भूमिका मिळतील? प्रश्न विचारणाऱ्यांना अक्षयाची सणसणीत चपराक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:40 AM

1 / 9
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक.
2 / 9
या मालिकेत पहिल्यांदाच प्लस साइज अभिनेत्री दिसली जिने झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढला. केवळ या ट्रेंडला छेदच दिला नाही. तर, अभिनेत्रीच्या साईजकडे पाहण्यापेक्षा तिच्या टॅलेंटकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन तिने प्रेक्षकांना दिला.
3 / 9
अलिकडेच अक्षयाला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेसाठी आणि तिने साकारलेल्या लतिका या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तिरेखा हा पुरस्कार मिळाला.
4 / 9
पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षयाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या.
5 / 9
'तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही प्रमुख पात्र व्हा. मला सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला. मला अभिनेत्री व्हायचं होतं. तेव्हा मनात एकच प्रश्न घोळत होता की एखाद्या जाड मुलीला कशा भूमिका मिळतील? सिनेमात फक्त साइड रोल किंवा बर्गर खाणारी एक जाड मैत्रिण किंवा एक जाड मैत्रीण जिची सगळे खिल्ली उडवतील.'
6 / 9
'पण मला आनंद आहे की मी माझ्या भूमिकेनं अनेक तरूण मुली आणि मुलांच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदत करत आहे. संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वत: काहीतरी निर्माण करा.मला मिळालेल्या पुरस्कारासाठी आणि प्रेमासाठी मी सदैव कृतज्ञ असेन', असं अक्षयानं म्हटलं आहे.
7 / 9
अलिकडेच एका मुलाखतीमध्ये अक्षयाने बॉडी शेमिंग करणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली होती.
8 / 9
अभिनयासाठी अक्षयाला अनेक पुरस्कार मिळाले असून तिने या पुरस्कारांचा छान संग्रह करुन ठेवला आहे.
9 / 9
अक्षयाने इन्स्टाग्रामवर या पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :अक्षया नाईकसेलिब्रिटीटेलिव्हिजन