Join us  

सीआयडी फेम स्मृती खन्नाने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो, दिसते खूपच गोंडस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 4:10 PM

1 / 7
मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना काही दिवसांपूर्वी आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
2 / 7
स्मृतीने काही दिवसांपूर्वी मुलीसोबतचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत स्मृतीने बाळाला कुशीत घेतले होते तर बाजूला गौतम बसलेला दिसत होता.
3 / 7
स्मृतीने आता तिच्या मुलीचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात आपल्याला तिचा चेहरा पूर्णपणे दिसत आहे.
4 / 7
स्मृती आणि गौतमची मुलगी खूपच क्यूट असून सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांच्या मुलीच्या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत.
5 / 7
स्मृती आणि गौतमने त्यांच्या या चिमुरडीचे नाव अयंका ठेवले असून सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना याविषयी सांगितले आहे.
6 / 7
स्मृती आणि गौतम सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते त्यांच्या मुलीचे अनेक फोटो पोस्ट करत आहेत.
7 / 7
स्मृती गरोदर असताना देखील तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
टॅग्स :टेलिव्हिजन