1 / 8सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जुन्या मालिका पाहायला मिळत आहेत. कृष्णा ही जुनी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.2 / 8कृष्णा या मालिकेत दामिनी कंवल शेट्टी यांनी यशोदा ही भूमिका साकारली होती.3 / 8यशोदाची भूमिका साकारलेल्या दामिनी या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहेत.4 / 8दामिनी यांनी 'श्रीकृष्णा' सोबतच 'अलिफ लैला' आणि परंपरा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.5 / 8दामिनी या अभिनेत्री असून निर्मात्या देखील आहेत. त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केली आहे.6 / 8दामिनी सध्या अभिनयक्षेत्रात कार्यरत नसल्या तरी त्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे काम पाहातात.7 / 8दामिनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड असून त्यांनी खूपच कमी वयात अभिनय करायला सुरुवात केली होती.8 / 8दामिनी यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी कृष्णा या मालिकेमुळे त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली.