मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'सरस्वती'चा सेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 16:15 IST
'सरस्वती' मालिकेचा देखणा सेट रसिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. मालिकेत दिसणारे कौलारू घराला बघताच गावाकडच्या घरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. ...
मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारा 'सरस्वती'चा सेट
'सरस्वती' मालिकेचा देखणा सेट रसिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. मालिकेत दिसणारे कौलारू घराला बघताच गावाकडच्या घरांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. घरा बाहेर तुळशीवृंदावनअशा वेगवेगळ्या पारंपरिक गोष्टींमुळे या मालिकेचा सेट मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे आहे.मालिकेचा सेट बनवतांना गावाडकडील घरांची ठेवण आणि शहरांतील घरांची ठेवण या दोन्ही गोष्टींचा पुरक विचार करण्यात आला आहे. त्यामुळेच बेडरूम एरिया,किचन एरिया आणि लिव्हींग रूम या गोष्टीं अगदी बारकाईने डिझाइन करण्यात आल्याचे दिसते.मालिकेत आस्ताद काळे आणि तितीक्षा तावडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे चिन्मय मांडलेकरने या मालिकेचे लेखन केले असून मालिकेतील संवादही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतायेत. पाहुयात ऑनस्क्रीन दिसणा-या 'सरस्वती' मालिकेचा देखणा सेट.