'उंच माझा झोका' मालिकेतली छोटी रमा आठवतेय ? आता तिला ओळखणेही कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 16:46 IST
1 / 10 याच मालिकेमुळे तेजश्रीला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. 2 / 10मात्र आता हीच तेजश्री करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. 3 / 10आज तिचा बदललेला लूक पाहून आपण पहातच राहाल.4 / 10दिलेल्या एका मुलाखतीत रमा भूमिका कशी मिळाली याविषयी तेजश्रीने सांगितले होते की, या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू असल्याचे कळल्यावर मला आई घेऊन गेली. 5 / 10तिथे माझी स्क्रीन टेस्ट झाली. ऑडिशन झाली. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी माझी निवड केली. 6 / 10माझ्या पणजी आजीचे नावही रमाबाई होते आणि माझे पणजोबा सेवासदनमध्ये मुख्याध्यापक होते, हा एक योगायोग आहे. 7 / 10ही भूमिका करताना मला जुन्या काळातील खूप गोष्टी, सवयी शिकाव्या लागल्या. मुख्य म्हणजे भाषा.नंतर ती भाषाही सवयीची झाली होती.8 / 10लहानपणापासून तेजश्री कलेशी जोडली गेली आहे. तेजश्रीला लिखाणाची आवड आहे. तिने दोन बालनाट्येसुद्धा लिहिली आहेत.9 / 10भालबा केळकर प्रतिष्ठानतर्फे तिने सादरही केली होती. ‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ ही ती दोन नाटके. ती दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनयही केला होता. 10 / 10अस्मिता चित्रच्या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्यासह काम केले आहे.