Join us  

IN PICS : चाळीशी ओलांडलेली उर्वशी ढोलकिया पुन्हा करणार लग्न? वाचा, काय म्हणाली ‘कोमोलिका’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 6:10 PM

1 / 9
टीव्ही इंडस्ट्रीत कोमोलिकाच्या नावाच्या ओळखली जाणारी उर्वशी ढोलकिया छोट्या पडद्यावरून गायब आहे. पण सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.
2 / 9
वयाच्या 16 व्या वर्षीच उर्वशीचे लग्न झाले. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि यानंतर काहीच महिन्यांनी तिचा पतीसोबत घटस्फोट झाला. तेव्हापासून उर्वशी सिंगल मदर बनून दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. पण आता आपल्या आईने दुसरे लग्न करून सेटल व्हावे, असे तिच्या मुलांनाच वाटू लागले आहे.
3 / 9
ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत स्वत: उर्वशीने याबद्दल सांगितले. दुसरे लग्न करण्याचा विचार कधीच मनात आला नाही का? असा सवाल या मुलाखतीत तिला विचारला गेला. यावर ती बोलली.
4 / 9
ती म्हणाली, प्रामाणिकपणे सांगायचे तर मला लग्नाचा विचार करायला वेळच नव्हता. तशी गरजही वाटली नाही. मी सतत कामात बिझी होते. मुलांची जबाबदारी सांभाळण्यात व्यग्र होते, त्यामुळे कधी दुस-या लग्नाबद्दल विचार करायला वेळच नव्हता.
5 / 9
आता मी लग्न करून सेटल व्हावे, असे माझ्या मुलांना वाटते. आई, तू लग्न का करत नाहीस? असा प्रश्न माझी मुलं अनेकदा मला विचारतात.त्यांच्या या प्रश्नावर मला हसायला येते, असेही तिने सांगितले.
6 / 9
लग्नाचे वय गेले, असे नाही. पण एका पॉर्इंट नंतर फार विचार करवत नाही. लग्न व्हायचेस असेल तर ते होईलही. मी एक स्वतंत्र महिला आहे. त्यामुळे माझ्या या स्वातंत्र्याचा सन्मान करणाराचा कोणी जोडीदार मला हवा आहे, असेही ती म्हणाली.
7 / 9
मध्यंतरी उर्वशी टीव्ही अभिनेता अनुज सचदेवला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. एक कपल या नात्याने या दोघांनी ‘नच बलिए 9’मध्ये भागही घेतला होता.
8 / 9
उर्वशी व अनुज दोघांनी त्यांच्या नात्याबाबत मीडियात काहीही न बोलणेच पसंत केले होते. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येत असे.
9 / 9
अनुज व उर्वशी दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्या दोघांचे ब्रेकअप झाले. अनुजपेक्षा उर्वशी मोठी असल्याने आणि त्यातही तिला दोन मुले असल्याने अनुजची आई या नात्यासाठी तयार नव्हती असे म्हटले जाते.
टॅग्स :उर्वशी ढोलकिया