Join us

OMG! पाहा दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाचे इनसाईड हनिमून फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 15:51 IST

'उडे दिल बेफिक्रे' म्हणत 'ये है मोहब्बते फेम' दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया सध्या पॅरिसमध्ये त्यांचे हनिमून एन्जॉय करत ...

'उडे दिल बेफिक्रे' म्हणत 'ये है मोहब्बते फेम' दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहिया सध्या पॅरिसमध्ये त्यांचे हनिमून एन्जॉय करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच दिव्यांका आणि विवेक रेशीमगाठीत अडकले. मात्र कामाच्या बिझी शेड्युलमुळे त्यांनी हनीमूनला जाण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता,. या कामामुळे लग्नानंतर दोघांनाही एकमेकांना म्हणावा तितका वेळ देत येत नव्हता. विवेक दाहिया 'कवच... काली शक्तीयों से' आणि दिव्यांका ये हैं मोहब्बते या मालिकेच्या शुटिंगमध्ये बिझी होते. आता मात्र दोघांनीही काम आणि शुटिंग बाजूला ठेवून सुट्टी एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच दोघेही युरोप टूरला रवाना झालेत. रोमँटिक शहर पॅरिसमधून दोघांनीही आपल्या हनीमूनला सुरुवात केली आहे.  सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात मच अवेटेड वेडिंग म्हणून दिव्यांका आणि विवेकच्या शुभमंगल सोहळ्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाआधी बरीच चर्चा झाली. त्यांच्या कपड्यांपासून, संगीत सोहळा ते थेट लग्नापर्यंत त्यांच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. त्यामुळेच आता त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा होणारच. लाडक्या दिव्यांका आणि विवेकच्या हनीमूनविषयी जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या प्रत्येक फॅनला आहे. त्यामुळेच की काय दोघांच्या हनीमून आणि युरोप टूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पॅरिसमधील धम्माल मस्ती विवेकने कॅमे-यात कैद करुन सोशल मीडियावर शेअर केलेत. दोघांनीही इथे ख्रिसमसचा आनंद घेतला. नवीन वर्षाचे सेलिब्रेशनही दोघे परदेशातच करणार आहेत. सध्या मिनी हनिमून आणि मेगा हनिमूनचा ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार आधी मिनी हनिमूनसाठी दिव्यांका आणि विवेक राजस्थानला जाऊन आले आहेत. मिनी हनिमून एन्जॉय केल्यानंतर त्यांचे मेगा हनिमून राहिले होते. मेगा हनिमून खास असावे त्यामुळेच ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनचा मुहूर्त साधत पॅरिस आणि लंडनचा फेरफटका मारणार आहेत.  तसे 2016 हे वर्ष दिव्यांका आणि विवेक दोघांसाठी खास ठरले आहे. याच वर्षी 8 जुलै दोघांचे भोपाळमध्ये थाटात लग्न केले होते .त्यानंतर खास आपल्या मित्रांसाठी दिव्यांकाने मुंबईतही रिसेप्शन पार्टी दिली होती.आता लग्नाचे 6 महिने पूर्ण झाल्यावर इअर एंड स्पेशल बनवण्यासाठी खास युरोप टुर करत आहेत.दोघांनीही त्यांचे हे हनीमुन स्पेशल करण्यासाठी सगळ्यात आधी पोहचले रोमँटिक शहर पॅरिसमध्ये.पाहुयात पॅरिसमध्ये दिव्यांका आणि विवेकच्या हनीमुनचे इनसाईड फोटो.