Join us  

आई मायेचं कवच! सुहानीची भूमिका साकारणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?; खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 6:04 PM

1 / 10
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच सध्या एक नव्या मालिकेची चर्चा रंगली आहे. ही मालिका म्हणजे 'आई मायेचं कवच'.
2 / 10
अभिनेत्री भार्गवी चिरमुले या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून ती आईच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3 / 10
भार्गवी चिरमुले हिला प्रत्येक प्रेक्षक ओळखतो. त्यामुळे तिच्या नावाची कायमच चर्चा रंगत असते. परंतु, या मालिकेचा प्रोमो पाहिल्यापासून एका वेगळ्याच अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
4 / 10
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सुहानी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे ही सुहानी नेमकी कोण? या पूर्वी ती कोणत्या मालिका, चित्रपटांमध्ये झळकलीये हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
5 / 10
या मालिकेत सुहानीची म्हणजेच भार्गवी चिरमुलेच्या मुलीची भूमिका अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर साकारत आहे.
6 / 10
अनुष्का मराठी कलाविश्वातील नवीन चेहरा असून यापूर्वी तिने एका चित्रपटात काम केलं आहे.
7 / 10
‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ या चित्रपटात अनुष्का झळकली आहे.
8 / 10
अनुष्का उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलदेखील आहे.
9 / 10
अनुष्का सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
10 / 10
सोशल मीडियावर अनुष्काने शेअर केलेला सुंदर फोटो
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीभार्गवी चिरमुले