ना मौनी रॉय अन् नाही शयंतनी घोष, ही आहे टेलिव्हिजनवरील पहिली नागिण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:24 IST
1 / 8एकता कपूर नागिनमधून पुनरागमन करत आहे. या शोबाबत रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. एकता कपूरच्या नागिनचा शोध सुरू आहे. जेव्हाही नागिनचे नाव येते, तेव्हा सर्वात पहिली आठवते ती म्हणजे मौनी रॉय आणि शयंतनी घोष. परंतु तुम्हाला टेलिव्हिजनवरील पहिली नागिण आठवते का? 2 / 8टीव्हीवर नागिन मालिका पहिल्यांदा १९९८ मध्ये आली होती. या मालिकेमध्ये अभिनेत्री सीमा कपूरने नागिनची भूमिका साकारली होती. सीमा कपूर नागिन म्हणून खूप लोकप्रिय झाली होती.3 / 8नव्वदच्या दशकात नागिन ही मालिका आली होता ज्यामध्ये नागिनच्या आयुष्याबद्दल दाखवण्यात आले होते. या मालिकेत सीमा कपूर पहिल्यांदाच नागिनीच्या रुपात छोट्या पडद्यावर आली आणि तिने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले आणि लोक तिच्यासाठी वेडे झाले होते.4 / 8सीमा कपूर नागिन लूकमध्ये खूप प्रसिद्ध झाली होती. ती गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली होती. डोक्यापासून पायापर्यंत सोन्याच्या दागिन्यांमध्ये ती दिसली होती. हेवी मेकअपसह सीमा खूपच सुंदर दिसत होती. आत्तापर्यंत कोणतीही नागिन सीमा कपूरसारखी दिसली नाही.5 / 8नागिनबद्दल बोलायचे झाले तर सीमा कपूरसोबत रोनित रॉय लीड रोलमध्ये दिसला होता. या दोघांची जोडी खूप आवडली होती. नागिननंतर सीमा सगळीकडेच चर्चेत आली होती. किस्मतमध्येही ती दिसली होती. हा शो रमेश सिप्पीने तयार केला होता.6 / 8सीमाने तिच्या करिअरमध्ये कुरुक्षेत्र, हम साथ साथ है, हसरतें, बिदाई, एक हजारों में मेरी बहना है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 7 / 8सीमाने प्रत्येक शोमध्ये सकारात्मक ते नकारात्मक अशा सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.8 / 8एकता कपूरच्या नागिनबद्दल बोलायचे झाले तर मौनी रॉय, तेजस्वी प्रकाश आणि निया शर्मा यात मुख्य नागिणीच्या भूमिकेत दिसल्या आहेत.