Join us  

Indian Idol 13मधून गायब आहे नेहा कक्कर, शो सोडून ती सध्या काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:03 PM

1 / 10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल सीझन १३ला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. सध्या या शोमधील एक परीक्षक गायब आहे.
2 / 10
ही परिक्षक दुसरी तिसरी कुणी नसून नेहा कक्कर आहे. ती शोमध्ये दिसत नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. ती कुठे गायब झालीय, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
3 / 10
नेहा कक्कर सध्या इंडियन आयडॉलमध्ये दिसत नाहीये कारण ती म्युझिक कॉन्सर्टमध्ये व्यस्त आहे.
4 / 10
नेहाच्या इन्स्टा पोस्टवरून तिच्याबद्दलचे सर्व अपडेट्स घेता येतील.
5 / 10
नेहा कक्करने तीन दिवसांपूर्वी दुबईतील तिच्या कॉन्सर्टचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये नेहा कक्करची जबरदस्त स्टाईल पाहायला मिळाली.
6 / 10
दुसरीकडे, कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करच्या रॉकिंग परफॉर्मन्सवरही लोक थिरकताना दिसले.
7 / 10
नेहाने तिचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये नेहा फॅमिली आणि पती रोहनप्रीतसोबत सेलिब्रेशन करत आहे.
8 / 10
आता नेहा पार्टी दुबईत करते की चंदीगडमध्ये, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
9 / 10
इंडियन आयडॉलच्या मंचावरून नेहा भलेही अनुपस्थित असेल, पण सोशल मीडियावर ती चाहत्यांचे उत्तम मनोरंजन करत आहे.
10 / 10
नेहाच्या रीलचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. त्याच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ इन्स्टावर भरपूर आहेत. नववर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शोच्या सक्सेस पार्टीमध्ये ती दिसेल, अशी आशा नेहा कक्करच्या चाहत्यांना आहे.
टॅग्स :नेहा कक्कर