Join us  

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील सुमी सुद्धा ‘साऊथ’च्या प्रेमात, मराठमोळ्या अमृताचे फोटो पाहा तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 4:57 PM

1 / 9
‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील सुमी आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे हिच्याबद्दल.
2 / 9
या सुमीला अर्थात अमृतालाही साऊथचा ज्वर चढला आहे. साऊथ लुकमध्ये तिने सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो अमृतानं शेअर केले आहेत.
3 / 9
दाक्षिणात्य पारंपरिक लुकमधील तिचे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले नसतील तर नवल. सध्या अमृताचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
4 / 9
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने तर तिला चक्क साऊथच्या चित्रपटांमध्ये ट्राय कर, असा सल्लाच दिला आहे. साऊथ फिल्ममध्ये ट्राय कर, मेगा सुपरस्टार होऊ शकशील, असं एका चाहत्याने लिहिलं आहे.
5 / 9
हे फोटो पाहून साऊथच्या ऑफर नक्की येणार तुला, असं एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं आहे. अनेकांनी सुंदर, अप्रतिम, लय भारी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
6 / 9
मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या अमृताला ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याआधी अमृताने ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.
7 / 9
अमृताचं पूर्ण नाव अमृता माणिकराव धोंगडे आहे. खरं तर अमृताच्या अभिनय क्षेत्रात येण्यास वडिलांचाविरोध होता. पण तिच्या आईने पाठिंबा दिला. आईच्या पाठिंब्यामुळे आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारुपास आली आहे.
8 / 9
अमृता अभिनय क्षेत्रात तशी योगायोगानेच आली. अमृताने अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरलं नव्हतं. अमृताची डॉक्टर होण्याची इच्छा होती. अभिनेत्री नसतो तर आपण डॉक्टर झालो असतो असं ती आजही सांगते.
9 / 9
मित्रांनी सांगितल्यानं तिनं ऑडिशन दिलं आणि तिची चित्रपटासाठी निवड झाली. पुढे ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही मालिका तिला मिळाली. या मालिकेत अमृता नॉन ग्लॅमरस भूमिकेत होती. पण खºया आयुष्यात ती चांगलीच ग्लॅमरस आहे.
टॅग्स :अमृता धोंगडेटेलिव्हिजन