Join us  

​Mother's Day Special : ‘आई’...तू आहेस तर आम्ही आहोत !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 5:58 AM

जगात सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे आई होय. आपणास या संसारात आणणाऱ्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मात्र ...

जगात सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे आई होय. आपणास या संसारात आणणाऱ्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. मात्र आपण तिला तो आनंद देऊ शकतो ज्यावर तिचा अधिकार आहे. एका आईपेक्षा मुलावर कोणीही जास्त प्रेम करु शकत नाही. अशातच आईला नेहमी सुखी ठेवणे हे प्रत्येक मुलाचे आद्य कर्तव्य आहे. आईला विशेष महत्त्व देण्यासाठीच ‘मदर्स डे’ एक चांगली संधी आहे. ‘मदर्स डे’ निमित्त आपल्या आवडत्या टीव्ही कलाकारांनीही आपल्या आईविषयी ऋणात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.  * माझी आई माझी मैत्रिणमाझी आई माझी अगदी जवळची मैत्रीण आहे. मला काही कमी पडू नये त्यासाठी ती दिवसाचे २४ तास कष्ट करते. मी लहान होतो तेव्हा पासून ती स्वत: सेलिब्रिटी असून घर आणि काम याचा उत्तम बॅलन्स कसा साधायचा हे तिच्याकडून शिकत आलो आहे. तिचं भरतनाट्यमची एक मोठी गुरु असणं आमच्या आई मुलाच्या नात्यामध्ये कधीच डोकावलं नाही. आज मी जे काही आहे ते माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.-सुयश टिळक, अभिनेता  * आई म्हणजे निरपेक्ष प्रेमाचा झरामाझ्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि तिकडच्या फेमस डिशेस, लोकल फूड खायला खूप आवडतं. मला वाटतं की मला पण ही आवड तिच्यामुळे निर्माण झाली. तिच्यामुळेच मला गाणी ऐकण्याची, कविता करण्याची, आपले विचार लेखणीतून मांडण्याची गोडी लागली. आई ही एकच अशी व्यक्ती असते जी तुम्हाला कुठल्याही अपेक्षेशिवाय किंवा अटीशिवाय प्रेम करते. आपण तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त केली, तिची काळजी घेतली तरीही ती खुश होते. सगळ्या आईंना मी मातृदिनाच्या शुभेच्छा देते.      -अश्विनी कासार, अभिनेत्री              * आईने मला जबाबदारी शिकविलीमाझ्या आईकडून मला डान्सची आवड निर्माण झाली. मी माझ्या आईकडून खूप काही शिकले. मी स्वत: एक आई आहे त्यामुळे आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं ही किती मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. मी सर्व आईंना हाच एक संदेश देऊ इच्छिते की तुमच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याआधी एक सुजाण आणि चांगलं माणूस बनवा. -फुलवा खामकर, कोरिओग्राफर   * माझ्यासाठी प्रत्येक दिवस मातृदिन‘मला माझ्या आई विषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठल्या खास दिवसाची गरज नाही. माझ्यासाठी प्रत्येक दिवस मातृदिनासारखाच असतो.’ एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आईने माझ्यासाठी जे काही केले आहे त्यासाठी मी तिचे मानत असलेले आभार कमीच पडतील. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा माझी आई मला कविता शिकवायची आणि त्यामुळे मला एक उत्तम अभिनेता बनण्यास मदत झाली आहे. आईचे प्रेम सर्वांत विशुद्ध असते कारण ते निरपेक्ष असते. आपण आपल्या आईला प्रत्येक क्षणी आपले तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगायला हवे.   -करण जोटवानी, अभिनेता           * माझ्या सुखाचे रहस्य माझी आईमाझ्या आईसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हसू पसरले आहे. मला आठवतंय मी एकदा माझ्या आईसोबत आजीच्या घरी गेले होते आणि तिथे उन्हाळ्याची सुट्टी आम्ही मजेत घालवली. यावर्षी मातृदिनी मी कदाचित चित्रीकरणात व्यस्त असेन पण मला थोडा तरी वेळ माझ्या आईसोबत घालवता येईल अशी आशा मी करते. मी सर्वांच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देते. -शीन दास, अभिनेत्री