Join us

दोनदा घटस्फोट झालेल्या अभिनेत्याशी केलं लग्न, श्रीलंकेत नवऱ्यासोबत एन्जॉय करतेय मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:46 IST

1 / 8
मराठीत अनेक ऑनस्क्रीन कलाकारांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. खुशबू-संग्राम, तितीक्षा-सिद्धार्थ, शिवानी-अजिंक्य ननावरे हे त्यापैकीच काही कलाकार.
2 / 8
यामध्ये एक अभिनेता असा आहे ज्याने दोनदा घटस्फोट झाल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा एका अभिनेत्रीशीच लग्नगाठ बांधली आहे. दोघंही सध्या श्रीलंकेतील फोटोंमुळे चर्चेत आहेत. कोण आहे हे कपल?
3 / 8
तर हे आहेत पियुष रानडे आणि सुरुची अडारकर. ६ डिसेंबर २०२३ साली त्यांनी लग्न करत सर्वांना धक्काच दिला. पियुषचं हे तिसरं लग्न असल्याने त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.
4 / 8
मात्र ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करत पियुष आणि सुरुची सुखाचा संसार करत आहेत. तसंच सध्या ते श्रीलंकेत व्हेकेशनचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत श्रेया बुगडे आणि तिचा नवराही आहे.
5 / 8
सुरुचीने तिचे काही फोटो शेअर केलेत ज्यात ती श्रीलंकेतील सौंदर्य दाखवत आहे. तसंच या निसर्गरम्य वातावरणात ती देखील खूप सुंदर दिसत आहे.
6 / 8
तर दुसरीकडे पियुषही कॅज्युअल लूकमध्ये हँडसम दिसतोय. समुद्रकिनारी काढलेले हे फोटो त्याने शेअर केलेत.
7 / 8
सुरुची तर श्रीलंकेच्या प्रेमातच पडली आहे. दर मैल बदलत जाणारं वातावरण, भाषा, खाणं, संस्कृती याचं तिने कौतुक केलं आहे.
8 / 8
सुरुचीने काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेतच तिचा वाढदिवसही साजरा केला. पियुष आणि श्रेयाने तिचा हा वाढदिवस आणखी खास बनवला.
टॅग्स :सुरुची आडारकरपियुष रानडेश्रीलंका