By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 12:03 IST
1 / 7सध्या सेलिब्रिटींचं आवडीचं डेस्टिनेशन म्हणजे मालदीव. मालदीवचा निळाशार समुद्र, सुंदर वातावरण, खाण्यापिण्याची चंगळ या सर्व कारणांमुळे अनेक जण तिथेच जाणं पसंत करतात.2 / 7नुकतीच ही मराठमोळी अभिनेत्रीही पतीसोबत मालदीवला गेली आहे. तेथील बीचवरचे फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड केलेत. अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होतोय.3 / 7ही अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule). हृता पती प्रतीक शाहसोबत मालदीव व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. प्रतीक फारसा कॅमेऱ्यासमोर येत नाही. तरी त्यांचा एक सेल्फी हृताने पोस्ट केला आहे.4 / 7व्हॅकेशनवर गेलेली हृता या फोटोंमधून भलतीच खूश दिसतेय. स्विमिंग करतानाचाही एक फोटो तिने स्टोरीमध्ये टाकला आहे. हृताचं हे व्हॅकेशन सोशल मीडियावर चर्चेत आहे.5 / 7काही दिवस मालदीवमध्ये राहण्याचा मूड कसा असणार याची झलक तिने फोटोंमधून दाखवली आहे. यात तिच्या चेहऱ्यावरचं हसूच सर्वकाही सांगून जातंय.6 / 7हृता प्रतीक शाहसोबत 18 मे 2022 रोजी लग्नबंधनात अडकली.प्रतीक हा टेलिव्हिजन आणि फिल्म दिग्दर्शक आहे. तर हृताने 'दुर्वा' या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. 'फुलपाखरु' या मालिकेने तरी खरी ओळख दिली. 7 / 7हृता आणि प्रतीक यांची ओळख आधी कामानिमित्तच झाली. हृता एकीच्या सांगण्यावरुन प्रतीकला भेटायला गेली होती. कारण प्रतीकचं शो सेटअप करण्याचं काम होतं. तेव्हाच त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.