Join us  

हृता दुर्गुळेची होणारी सासूदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री; मराठीसह हिंदी मालिकांमध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 11:02 AM

1 / 11
'फुलपाखरू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. सध्या हृता झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
2 / 11
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर हृताने तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात.
3 / 11
काही दिवसांपूर्वीच हृताने तिच्या प्रियकरासोबत एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. तेव्हापासून सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा आहे.
4 / 11
हृता प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक प्रतिक शाहला डेट करत आहे. प्रतिक उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच उत्कृष्ट डान्सरदेखील आहे.
5 / 11
विशेष म्हणजे प्रतिकची आईदेखील कलाविश्वाशी निगडीत आहे.
6 / 11
फार मोजक्या जणांना प्रतिकच्या कुटुंबाविषयी ठावूक आहे. यात प्रतिकची आईदेखील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
7 / 11
त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हृताच्या होणाऱ्या सासूबाईंची चर्चा रंगली आहे.
8 / 11
प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह, प्रतिकची आई असून त्यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
9 / 11
मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा असंख्य मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10 / 11
सध्या सोशल मीडियावर प्रतिक आणि हृताप्रमाणेच मुग्धा शाह यांची चर्चा रंगली आहे.
11 / 11
हृताचा बॉयफ्रेंड प्रतिकने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था, मनमोहिनी या गाजलेल्या मालिकांसाठी काम केले आहे.
टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीटेलिव्हिजन