Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री पोहोचली सिंगापूरला, फोटोतील मॉर्डन लूक पाहून चाहते अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 4:47 PM

1 / 9
छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेला आणि लोकप्रिय असा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. या शोमधूनच अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर घराघरात पोहोचली.
2 / 9
अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या रसिकाला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिका प्रेक्षकांना हसवते.
3 / 9
रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.
4 / 9
नुकतेच रसिकाने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. रसिकाचे हे फोटो सिंगापूरमधले आहेत.
5 / 9
काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'ची टीम सिंगापूरला गेली होती. तिथेही हास्यजत्रेचे शो हाऊसफूल होत होते.
6 / 9
प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच रसिकाने सिंगापूरमध्ये स्वत:ला देखील वेळ दिला.
7 / 9
सिंगापूरमधील अनेक प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळांना तिने भेटी दिल्या.
8 / 9
सिंगापूरमध्ये मराठमोळ्या रसिकाचा मॉर्डन लूक पाहायला मिळायला. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
9 / 9
रसिकाने केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. लवकरच ती प्रसाद ओकच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार