Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुसरा धक्का! ओंकार पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय विनोदी कलाकाराची शोमधून एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 12:06 PM

1 / 8
महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. हास्यरसिकांना हा कार्यक्रम आठवड्यातले चार दिवस पाहायला मिळतो.
2 / 8
टेन्शनवरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra Show) मधून विनोदवीर ओंकार भोजने (Onkar Bhojane) घराघरात पोहचला. मात्र आता तो या शोमधून एक्झिट घेणार आहे. हे चाहत्यांना कळताच त्यांना धक्का बसला होता.
4 / 8
ओंकार आता झी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाला आहे. ओंकार भोजने पाठोपाठ आणखी एक कलाकारांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला रामाराम ठोकला आहे.
5 / 8
आपल्या विनोदशैलीच्या जोरावर अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या पॅडीनं अर्थात पंढरीनाथ कांबळेने ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून एक्झिट घेतली आहे.
6 / 8
पॅडी ही आता झी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाला आहे.
7 / 8
अनेक गाजलेले चित्रपट, टीव्ही शो यांच्या माध्यमातून पॅडीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
8 / 8
पंढरीनाथ कांबळे याने गेली कित्येक वर्ष मराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला असून आता तो ‘फू बाई फू’च्या माध्यमातून आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारझी मराठी