Join us  

खुशखबर..! शेवंता लवकरच येणार भेटीला, 'रात्रीस खेळ चाले २'च्या शूटिंगला होणार सुरूवात  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 8:03 PM

1 / 10
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू देश पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे.
2 / 10
तसेच मालिकांच्या चित्रीकरणाला देखील परवानगी मिळाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आता लवकरच त्यांच्या भेटीला येतील.
3 / 10
पण या अडीच महिन्यांच्या मोठ्या सुट्टी नंतर भूमिकेपासून लांब असलेले कलाकार चित्रीकरणाची तयारी कशी करत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.
4 / 10
रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतील सर्वांची आवडती शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि देखील या सुट्टीमध्ये तिच्या भूमिकेपासून लांब गेली आहे का असं विचारलं असताना ती म्हणाली, 'मी माझ्या भूमिके पासून कधी वेगळी नव्हतेच.
5 / 10
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव माझ्या भूमिकेतील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. शिवाय जेव्हा मी इंस्टाग्रामवर लाईव्ह गेले तेव्हा देखील मी शेवंताचा लुक केला होता, असे अपूर्वाने सांगितले.
6 / 10
अपूर्वा म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये मी प्रेक्षकांना माझ्या पात्राशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शेवंताचं पात्र हे माझ्या अंगात इतकं भिनलंय, त्यामुळे हि भूमिका पुन्हा साकारताना निश्चितच मजा येईल.
7 / 10
अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे.
8 / 10
तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली.
9 / 10
तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे.
10 / 10
तसेच इश्कवाला लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती.
टॅग्स :अपूर्वा नेमळेकररात्रीस खेळ चाले