Join us  

'चार दिवस सासूचे' फेम कविता मेढेकरच्या लेकीला कधी पाहिलंय? आई इतकीच सुंदर दिसते मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 2:07 PM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे कविता मेढेकर. चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि शांत स्वभाव यामुळे कविताने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 9
नाटक, मालिका, चित्रपट असा प्रवास करणऱ्या कविता मेढेकर म्हणजे पूर्वाश्रमीची कविता लाड. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या या अभिनेत्रीने चार दिवस सासूचे या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली.
3 / 9
कलाविश्वाप्रमाणेच कविता सोशल मीडियावरही सक्रीय असते. यात अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबतचे वा तिच्या नाटकांचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 9
अलिकडेच कविताने तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यामुळे तिच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत.
5 / 9
'घायाळ' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या कविताचे लेकदेखील तिच्या इतकीच सुंदर आणि सुस्वभावी असल्याचं दिसून येतं.
6 / 9
कविताच्या लेकीचं नाव सनाया असल्याचं सांगण्यात येतं. सनाया २३ वर्षांची असून सोशल मीडियावर तिचा फारसा वावर नाही.
7 / 9
कविताने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 9
'चार दिवस सासूचे', 'उंच माझा झोका', 'राधा ही बावरी', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'एका लग्नाची गोष्ट', 'लपून छपून', 'उर्फी', 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या आणि अशा कित्येक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये तिने काम केलं आहे.
9 / 9
कविताने २००३ साली आशिष मेढेकर यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना ईशान आणि सनाया ही त्यांची दोन मुले आहेत.
टॅग्स :कविता लाडसिनेमासेलिब्रिटी