मराठमोळा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रचा वेडिंग अल्बम पाहिलंत का?, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 19:53 IST
1 / 8छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अभिजित श्वेतचंद्रचा सेजल वरदेसोबत २३ फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 2 / 8११ जून २०२२ रोजी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र आणि सेजल वरदे यांचा साखरपुडा झाला होता. जवळपास ८ महिन्यानंतर हे दोघे लग्नबेडीत अडकले आहेत. 3 / 8अभिजीत आणि सेजलचा विवाहसोहळा अलिबागमध्ये पार पडला. नुकतेच अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. 4 / 8फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिले की, आजवर सर्वात आनंदी दिसतो ते छायाचित्र शेअर करून या नवीन प्रवासाची सुरुवात करूया. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे! तर ही एक झलक —आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसाची.5 / 8मूळचा अलिबागकर असलेला अभिजित श्वेतचंद्र पदवी घेण्यासाठी मुंबईत आला. शिक्षणानंतर त्याने काही दिवस नोकरी देखील केली. पण त्याने आवडीच्या क्षेत्रातच करिअर करायचा निर्णय घेतला. 6 / 8त्यानंतर त्याने मराठी रंगभूमीवर त्याने नाटकांत काम करायला सुरुवात केली आणि आज एक यशस्वी अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. 7 / 8बाजी, गणपती बाप्पा मोरया,साजणा, बापमाणूस अशा मराठी चित्रपटांसोबत काही हिंदी चित्रपटांत देखील त्याने काम केले आहे. अभिजित श्वेतचंद्रची पत्नी सेजल वरदे ही देखील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 8 / 8पण अभिनेत्रीपेक्षा तिला मॉडेलिंगमध्ये जास्त यश संपादन करता आले. तिने रायगड क्वीन, मिस लोणावळा, मिस अलिबाग, मुलुंड क्वीन अशा अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.