Join us  

कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:11 PM

1 / 10
इडस्ट्रीतील अभिजीत आणि सुखदा सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.
2 / 10
अभिजीत आणि सुखदा यांचं लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. दोघांची लव्ह स्टोरीही स्पेशल आहे.
3 / 10
सोशल मीडियावरुन दोघांची एकमेकांशी ओळख झाली. फेसबुकच्या माध्यमातून दोघं पहिल्यांदा भेटले. अभिजीत आणि सुखदा हे दोघंही मूळचे नाशिकचे.
4 / 10
अभिजीतचा नाटकातील आणि सुखदाच्या डान्समधील एका कॉमन फ्रेंडमुळे दोघांची एकमेकांशी ओळख होती. मात्र दोघं कधीही एकमेकांशी बोलले नव्हते.
5 / 10
त्याच काळात अभिजीतची माझिया प्रियाला प्रीत कळेना ही मालिका लोकप्रिय ठरली होती. या मालिकेमुळे अभिजीत रसिकांचा लाडका बनला होता.
6 / 10
ही मालिका पाहून सुखदाने फेसबुकवर अभिजीतचं कौतुक केले होते. नाशिकचा मुलगा मालिकेत एवढं चांगलं काम करतो आहेस, हे कौतुकास्पद आहे अशा शब्दांत सुखदाने फेसबुकवर अभिजीतवर स्तुतीसुमनं उधळली होती.
7 / 10
यानंतर अभिजीत आणि सुखदा यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. फेसबुकवरील या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.
8 / 10
1 फेब्रुवारी 2013 रोजी दोघंही रेशीमगाठीत अडकले. नाशिकमध्ये अभिजीत आणि सुखदाचं शुभमंगल मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं.
9 / 10
अभिजीत आणि सुखदा हे दोघंही अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.
10 / 10
दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.
टॅग्स :अभिजीत खांडकेकरसुखदा खांडकेकर