Join us  

मॉर्डन किचन, खास नेमप्लेट अन्...; फोटोंमधून पाहा रुचिरा जाधवच्या नव्या घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 7:05 PM

1 / 10
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव. या मालिकेने रुचिराला लोकप्रियता मिळवून दिली.
2 / 10
रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असते. रुचिराने नुकतीच एक खूशखबर चाहत्यांना दिली आहे. तिने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन घर खरेदी केलं आहे.
3 / 10
नव्या घराचे फोटो रुचिराने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधून रुचिराच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
4 / 10
रुचिराच्या नव्या घराचं नेमप्लेटही खास आहे. या नेमप्लेटवर तिचं नाव आणि श्रीकृष्णाचं मोरपीस पाहायला मिळत आहे.
5 / 10
या फोटोंमध्ये रुचिराच्या घरातील मॉडर्न किचनचीही झलक दिसत आहे. किचनमध्ये आकर्षक फर्निचर करण्यात आलं आहे.
6 / 10
घराचा एक कोपरा रुचिराने तिच्या ट्रॉफी ठेवून सजवला आहे.
7 / 10
तर दुसऱ्या भींतीवर तिच्या फोटोंच्या फ्रेम आणि कोलाज लावण्यात आलं आहे.
8 / 10
'ही शेवटची स्टेप नाही...पण, पहिली नक्कीच आहे. प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे,' असं म्हणत रुचिराने तिच्या नव्या घराची झलकही दाखवली आहे.
9 / 10
रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.
10 / 10
सध्या रुचिरा स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत काम करत आहे. तिने 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभाग घेतला होता.
टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार