Join us  

Bigg Boss Marathi 3: लाईट्स, कॅमेरा & अ‍ॅक्शन; महेश मांजरेकरांची रॉयल एण्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 7:00 PM

1 / 7
छोट्या पडद्यावरील तुफान चर्चिला जाणारा शो 'बिग बॉस मराठी' अखेर आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
2 / 7
मोठ्या दणक्यात 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचं ग्रँड प्रिमियर सुरु झालं असून यंदाच्या पर्वात दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांनी मोठ्या थाटात मंचावर एण्ट्री घेतली.
3 / 7
महेश मांजरेकरांची रॉयल एण्ट्री पाहून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांमध्ये आता बिग बॉसच्या या नव्या पर्वाची उत्सुकता वाढली आहे.
4 / 7
बिग बॉसच्या मंचावर महेश मांजरेकरांना पाहिल्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये उत्साह दाटून आला आहे.
5 / 7
“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आता पुन्हा एकदा कानावर पडणार यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
6 / 7
मोठ्या दणक्यात महेश मांजरेकरांची एण्ट्री झाल्याचं दिसून येत आहे.
7 / 7
प्रत्येक पर्वाप्रमाणेच यंदाच्या पर्वातही महेश मांजरेकर सूत्रसंचालन करणार आहेत.
टॅग्स :बिग बॉसमहेश मांजरेकर