Join us

बिग बॉस : इंडियावले विरुद्ध सेलिब्रिटींमध्ये घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:53 IST

बिग बॉस सीजन-१०च्या सुरुवातीला सेलिब्रिटी विरुद्ध इंडियावाले असा प्रयोग केला होता. काहीकाळानंतर इंडियावाले यांना सेलिब्रिटींचा दर्जा मिळाल्याने बिग बॉसने ...

बिग बॉस सीजन-१०च्या सुरुवातीला सेलिब्रिटी विरुद्ध इंडियावाले असा प्रयोग केला होता. काहीकाळानंतर इंडियावाले यांना सेलिब्रिटींचा दर्जा मिळाल्याने बिग बॉसने हे अंतर मिटवताना आता घरात सगळेच सेलिब्रिटी असल्याचे जाहीर केले होते. मात्र सेलिब्रिटी आणि इंडियावाले यांच्यातील दरी मिटता मिटत नसल्याचे बघावयास मिळत आहे. कारण सध्या घरात इंडियावले विरुद्ध सेलिब्रिटी असा जोरदार सामना रंगला आहे. }}}} बिग बॉसने घरातील सदस्यांना ‘अदालत’ असा टास्क दिला होता. ज्यामध्ये गौरवचा वकील रोहन व स्वामी ओमच्या वकिलाची जबाबदारी मनू पंजाबी याने स्वीकारली, तर जज म्हणून मनवीर गुर्जर याने भूमिका पार पाडली. टास्कनुसार गौरव चोपडा आणि स्वामी ओमला कठघºयामध्ये उभे करण्यात आले होते. मात्र या आरोप-प्रत्यारोपाच्या लढाईत बानी जे हिने मधेच उडी घेतल्याने मनू आणि तिच्यात चांगलीच बाचाबाची झाली. याचा परिणाम म्हणून इंडियावाले विरुद्ध सेलिब्रिटी असा सामना रंगला. }}}} मुळात दिवसाची सुरुवातच वादाने झाली. जेव्हा रोहन आणि लोपा बेडरूममध्ये गप्पा मारत असतात. तेव्हा स्वामी ओम त्यांच्याकडे बघून नॉनस्टॉप बोलण्यास सुरुवात करतात. स्वामी ओमचे बोलणे ऐकून संतापलेली लोपा त्यांच्या अंगावर धावून जाते. त्यांना ट्रेनमधील भिकारी म्हणत, तुझ्यासारखे लोक माझ्या आजूबाजूलादेखील फिरकत नाही, अशा शब्दात सुनावते. लोपा स्वामी ओमवर जेवढ्या शिव्यांची बरसात करीत असते, तेवढ्याच शिव्या स्वामी ओमही लोपाला देत असल्याने रोहन त्यांच्या अंगावर धावून जातो. मला या घरात रहायचे नाही, मग मी स्वामी ओम याची पिटाई करूनच घराबाहेर पडणार असल्याचे सांगत तो स्वामी ओमच्या दिशेने जातो. मात्र घरातील काही लोक मध्यस्थी करीत हा वाद सोडवितात. }}}} त्यातच बिग बॉस घराचा कॅप्टन मनवीरला या आठवड्यातील दंडासाठी पात्र ठरलेल्या दोन सदस्यांचे नावे विचारतात. त्यावर मनवीरने गौरव आणि स्वामी ओम यांचे नाव सुचविले. गौरवने इग्लू टास्कदरम्यान घरातील नियमांचे उल्लंघन केले तर स्वामी ओम यांनी कॅप्टनशीप टास्कमध्ये रोहनच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे कारण सांगत दोघांची घरातील जेलमध्ये रवानगी केली. गौरवने कुठल्याही प्रकारचा नकार न देता जेलमध्ये जाण्यास समर्थता दर्शविली. जो व्यक्ती माझ्यासोबत जेलमध्ये असेल त्याला मी शहानपणा शिकवेल असे म्हणत तो तेथून जेलमध्ये जाण्यास निघाला. मात्र स्वामी ओम नेहमीप्रमाणेच नॉनस्टॉप बडबड करत जेलमध्ये जाण्यास निघाले. ज्या व्यक्तीला कॅप्टन बनविण्यासाठी मी रोहनशी वाद घातला तो व्यक्तीच कृतघ्न निघाला. रोहनच्या भीतीपोटीच मनवीरने मला जेलमध्ये टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वामी ओमचा संताप बघून बिग बॉसने ‘अदालत’ हा टास्क देत गौरव आणि स्वामी ओमला शिक्षेपासून स्वत:चा बचाव करण्याची एक संधी दिली. या टास्कमध्ये दोन्ही कैद्यांवर खटला चालविण्यात येणार असून, ज्याचा यात विजय होईल त्याची सुटका केली जाणार असल्याचे बिग बॉसने सांगितले. त्यानुसार मनू आणि रोहन या दोघांची वकालत करतात. जज बनलेला मनवीर सुरुवातीलाच स्पष्ट करतो की, स्वामी ओमने या टास्कमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना थेट जेलमध्ये पाठविले जाईल. मनू आणि रोहन दोघांचीही बाजू मांडताना एकमेकांच्या आरोपांचे खंडण करतात. मात्र याच दरम्यान मनू बानीला विचारतो की, स्वामी ओमने तुझ्या आईविषयी अपशब्द वापरलेत मग, तू त्यांना धक्का देणे कितपत योग्य होते. मनूचा हा प्रश्न बानीच्या चांगलाच जिव्हारी लागतो. ती या प्रश्नाचे उत्तर देणे संयुक्तिक समजत नाही. ती मनूला विचारते, हा प्रश्न आता विचारण्यामागचे कारण काय? येथूनच वादाला सुरुवात होते. एकीकडे सेलिब्रिटी तर दुसरीकडे इंडियावाले असे एकजूट होत आपापसात भिडतात. मनू आणि बानीमध्ये तर घमासान बघावयास मिळते. अखेर मनू स्वामी ओम यांचे मनवीरला औषधे दाखवित त्यांना जेलमध्ये ठेवले जाऊ नये अशी विनंती करतो. मनवीर निर्णय देताना स्वामी ओमची मुक्तता, तर गौरवला जेलमध्ये पाठवितो. पुढे बानी घरातील किचनमध्ये रडत रडत जाते. याच दरम्यान मनूही त्याठिकाणी येतो. बानी पुन्हा मनूला याविषयी जाब विचारते, त्यामुळे पुन्हा त्यांचा वाद होतो. रोहन या दोघांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न करतो. पुढे बानी रडत रडत गौरवकडे जाते. गौरव तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचदरम्यान रोहनही तिथे येतो अन् तिची समजूत काढतो. मात्र यासर्व प्रकारात घराचा कॅप्टन मनवीर याची भूमिका संशयास्पद असल्याचे नीतिभा त्याला सांगते. तू जजबरोबरच घराचा कॅप्टन आहेस ही बाब चांगली लक्षात ठेवणे अपेक्षित होते, परंतु तू फक्त जजच्याच भूमिकेत होता, त्यामुळेच हा सर्व वाद घडला. तू कॅप्टन म्हणून सगळ्यांना सांभाळून घ्यायला हवे होते, असे त्याला सुचविते. मात्र मित्राच्या (मनू) प्रेमापोटी मनवीर कॅप्टन असल्याचे विसरून गेला नाही ना, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला नसेल तरच नवल.