1 / 8 अनेक कलाकार हे अभिनय क्षेत्र सोडून थेट भक्तीच्या मार्गावर चालू लागले. भक्तिमार्गाचा प्रसार करू लागले. 2 / 8अशीच एक अभिनेत्री आहे जिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आणि आता ती कृष्णभक्त झाली आहे.3 / 8अभिनेत्री प्रियांका पंडित हिनं एकेकाळी इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं होतं. मात्र एका बनावट एमएमएस प्रकरणामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.4 / 8प्रियांकाने भोजपुरी सिनेसृष्टीत पदार्पण करताच अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली. खेसारी लाल यादव, पवन सिंह आणि रितेश पांडे यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत तिने यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. 5 / 8पण, तिचा एक फेक एमएमएस व्हायरल झाला आणि करिअरला मोठा फटका बसला. नातेसंबंध तुटले, प्रोजेक्ट्स बंद झाले आणि एकाकीपणाची वेळ आली.6 / 8प्रियांकाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. तिने सांगितले की, तिची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न केले गेले. याचा तिच्या करिअरवर वाईट परिणाम झाला आहे. 7 / 8या कठीण प्रसंगानंतर प्रियांकाने स्वतःला कृष्णभक्तीत अर्पण केलं. तिने चित्रपटसृष्टीचा निरोप घेत वृंदावनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आता ती प्रेमानंद महाराजांची अनुयायी बनून आध्यात्मिक मार्गावर आहे.8 / 8