Join us  

इतका तमाशा कशासाठी? बिकिनी घालणारी मी काही...! भयानक ट्रोल झाली ही अभिनेत्री, असे दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 8:00 AM

1 / 9
अभिनेत्री डोनल बिष्ट हिला सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले जातेय. कारण काय तर तिचे बिकिनी फोटो.
2 / 9
होय, डोनलने तिचे बिकिनी फोटो शेअर केलेत आणि लोकांनी तिला भयानक ट्रोल केले.
3 / 9
ट्रोलर्सनी डोनला अश्लिल, अभद्र भाषेत ट्रोल केले. अगदी नको ते बोलले. आता या ट्रोलर्सला डोनलने त्यांच्यात भाषेत उत्तर दिले आहे.
4 / 9
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये तिने ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला. कपड्यांवरून कुठल्याही महिनेचे चरित्र ठरवले जाऊ शकत नाही. कपड्यांवरून नाही तर तिच्या वागणुकीवरून तिला जज करा, असे तिने लिहिले.
5 / 9
मला आवडतात, ते कपडेच मी घालणार. याच्याशी लोकांचे काहीही देणेघेणे नाही. माझ्या कपड्यांवरून माझ्यावर अश्लिल कमेंट करणाºयांचे स्वत: किती नीच आहेत, हेच यावरून दिसते, असेही ती म्हणाली.
6 / 9
बिकिनी घालणारी मी काही जगातील पहिली महिला नाही, मग इतका तमाशा कशाला करता? असा बोचरा सवालही तिने केला.
7 / 9
माझी आई अनेकदा ट्रोलर्सच्या कमेंट्समुळे अस्वस्थ होते आणि मला अनेक फोटो डिलीट करण्यास सांगते. पण माझे काम लक्षात घेता अनेकदा मला अशा अश्लिल कमेंट्सकडे दुर्लक्ष करते. चांगले तेच घेण्याचा प्रयत्न करते, असेही ती म्हणाली.
8 / 9
मला वादात राहायला आवडत नाही. पण मला निष्कारण वादात गोवले जाते. जसे आज झालेय. कधी कधी लोक मर्यादा लांघतात. म्हणून मी हे बोलतेय. याऊपरही तुम्ही हे थांबवले नाही तर मला सायबर क्राईम डिपार्टमेंटची मदत घ्यावी लागेल, असा इशाराही तिने दिला.
9 / 9
डोनल ही एक टीव्ही अभिनेत्री व मॉडेल आहे. एम दिवाना था, लाल इश्क, रूप-मर्द का नया स्वरूप, दिल तो हॅपी है जी अशा अनेक मालिकेत तिने काम केलेय.
टॅग्स :टेलिव्हिजन