Join us  

'आशिक बनाया आपने'मधील इमरानसोबतच्या किसींग सीनबाबत १८ वर्षांनी तनुश्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "सीन शूट करताना..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 3:07 PM

1 / 9
२००५ साली प्रदर्शित झालेल्या 'आशिक बनाया आपने' या सिनेमातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या सिनेमातील इमरान हाशमी आणि तनुश्री दत्ताची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती.
2 / 9
'आशिक बनाया आपने'मधील इमरान-तनुश्रीच्या रोमँटिक सीन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या सिनेमातील त्यांच्या किसींग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती.
3 / 9
आता १८ वर्षांनी इमरान हाशमीबरोबरच्या किसींग सीनबाबत तनुश्रीने मौन सोडलं आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने याबाबत भाष्य केलं आहे.
4 / 9
तनुश्री म्हणाली, 'पहिल्या दिवसापासून इमरान हाशमी माझ्यासाठी केवळ अभिनेता होता. मी त्याच्याबरोबर तीन चित्रपट केले आहेत.'
5 / 9
'आम्ही चॉकलेटमध्येही एक किसींग सीन शूट केला होता. पण, तो चित्रपटातून काढून टाकण्यात आला होता.'
6 / 9
'पहिल्या वेळेस किसींग सीन शूट करताना खूप विचित्र वाटलं होतं. कारण, वास्तविक पाहता आमच्यात केमिस्ट्री नव्हती. पण , दुसऱ्या वेळेला मला थोडं कमी विचित्र वाटलं'
7 / 9
'त्याची किसर बॉय अशी इमेज आहे. पण, तो सहज किस करू शकत नाही. आणि अर्थात मीदेखील नाही.'
8 / 9
तनुश्री दत्ताने २००५ साली 'आशिक बनाया आपने'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती रकीब, ढोल, सास बहू और सक्सेस यांसारख्या चित्रपटात झळकली.
9 / 9
इमरान हाशमी आणि तनुश्री ही जोडी 'चॉकलेट : डीप डार्क सीक्रेट्स', 'गुड बॉय बॅड बॉय' आणि 'आशिक बनाया आपने' या सिनेमांत दिसली होती.
टॅग्स :तनुश्री दत्ताइमरान हाश्मीसिनेमा