Join us  

सुबोध भावे ते पूजा सावंत; मराठी कलाविश्वातील 'या' 9 कलाकारांचं शिक्षण माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 7:00 AM

1 / 9
पूजा सावंत - मराठी कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही नशीब आजमावणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. पूजाने एसआयडब्ल्यूएसमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
2 / 9
वैभव तत्ववादी - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. मराठीसह बाजीराव मस्तानी या बॉलिवूडपटातही वैभव झळकला आहे. वैभव अभिनेता असण्यासोबतच इंजिनिअरदेखील आहे. त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
3 / 9
स्वप्निल जोशी - मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय या नावाने ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी दुनियादारी चित्रपटामुळे विशेष लोकप्रिय झालेल्या स्वप्नीलने कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. तसंच त्याचं एलएलबी पदवीचं शिक्षणही झालं आहे.
4 / 9
नेहा महाजन - पुण्यात लहानाची मोठी झालेली अभिनेत्री नेहा महाजन हिने मास्टर्स इन फिलोसॉफीमध्ये डिग्री घेतली आहे.
5 / 9
रितेश देशमुख- महाराष्ट्राचा लाडका लेक रितेश देशमुख याने मुंबईतील कमला रहेजा कॉलेजमधून आर्टिटेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
6 / 9
सौरभ गोखले - सौरभ गोखले याने एमबीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे. सध्या तो अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकत आहे.
7 / 9
सुबोध भावे- सुबोध भावे हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. उत्तम अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. सुबोधने एम कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
8 / 9
रसिका सुनील -लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील हिने युएसमधून फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
9 / 9
सई ताम्हणकर- आपल्या बोल्डनेस आणि बिंधास्तपणामुळे चर्चेत येणाऱ्या सईने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमासुबोध भावे पूजा सावंतवैभव तत्ववादीसई ताम्हणकर