SRK 30 Years: पठाणसाठी 100 कोटी घेणाऱ्या शाहरुख खानला, पहिल्या सिनेमासाठी मिळाले होते केवळ इतके पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 18:33 IST
1 / 8बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. देशातच नाही तर जगभर त्याचे चाहते आहेत. आता शाहरुख खान त्याची दुसरी इनिंग सुरू करतो आहे. (Photo Instagram) 2 / 8 4 वर्षांच्या ब्रेकनंतर तो पुन्हा कमबॅक करतोय. विशेष म्हणजे त्याने यावर्षी इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत आणि याच वर्षी तो कमबॅक सुद्धा करतोय. (Photo Instagram) 3 / 8पठाण, डंकी आणि जवान या तीन चित्रपटांसह शाहरुख खान पुन्हा एकदा बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. हे तिन्ही चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.(Photo Instagram) 4 / 8सध्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. पठाण सर्वाधिक चर्चेत आहे कारण शाहरुख खानला या चित्रपटासाठी 100 कोटींची फीस मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानला या चित्रपटासाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे.(Photo Instagram) 5 / 8इंडस्ट्रीत ३० वर्षे उलटून गेल्यानंतरही शाहरुख खानची लोकप्रियता तेवढीच आहे, त्यामुळे त्याला मागितलेली रक्कम दिली जात आहे. पण तुम्हाला माहित आहे का की शाहरुख खानला 30 वर्षांपूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपटासाठी किती फी मिळाली होती?(Photo Instagram) 6 / 81992 मध्ये शाहरुख खानने दिवाना या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात तो मेन लीडमध्ये नव्हता तर सेकंड लीडमध्ये होता, ज्याची एंट्री चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही आहे.(Photo Instagram) 7 / 8या चित्रपटासाठी त्याला 11 हजार रुपये साइनिंग रक्कम मिळाली आणि संपूर्ण चित्रपटासाठी त्याला केवळ 1.50 लाख रुपये मिळाले.(Photo Instagram) 8 / 8पण फी पेक्षा जास्त, या चित्रपटाच्या मोबदल्यात त्याला जे मिळाले ते लोकांचे खूप प्रेम, या चित्रपटात त्याचे भरभरून कौतुक झाले. एवढ्यावरच शाहरुख थांबला नाही आणि बघता बघता तो इंडस्ट्रीचा किंग खान आणि आता पठाण बनणार आहे.(Photo Instagram)